पितृ पक्ष 2022 पितृ दोष लक्ष्ण, उपाय व पितर कोणत्या रूपात घरी येतात
पितृ पक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचा आदर सत्कार करण्याचा काळ असतो. असे म्हणतात को पितृ पक्ष मध्ये आपले पूर्वज 15 दिवस पृथ्वीवर येतात व त्याचे प्रियजनानी केलेले पिंडदान, तर्पण व श्राद्ध मुळे ते खुश होतात.
The text Pitru Paksha 2022 Pitru Dosh lakshan and Upay in Marathi be seen on our You tube Chanel PitruPaksha 2022
10 सप्टेंबर 2022 शनिवार ह्या दिवसा पासून पितृ पक्ष सुरू झाला आहे. श्राद्ध पक्ष मधील हे 15 दिवस पितृ दोषा पासून मुक्ती मिळण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी खूप चांगले आहेत. जर आपले पूर्वज नाराज असतील तर आपल्या पुढच्या पिढीला पितृ दोषाचा त्रास सोसावा लागतो. म्हणूनच पितृ पक्षमध्ये आपल्या चुकांची माफी मागून आपल्या पितरांना शांत करून त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत.
माता पिताचा अनादर, मृत्यु झाल्यावर आपल्या प्रियजनांचे पिंडदान, तर्पण व श्राद्ध न करणे त्यामुळे पूर्ण परिवाराला पितृ दोष लागू शकतो.
आपल्या पितरांचा अपमान करणे, कोणत्या असहायची हत्या करणे, पिंपळ, निम व वाड्याच्या झाड तोडणे, अनाहूत पणे नागाची हत्या करणे हे पितृ दोषाचे कारण असू शकते.
कसे ओळखावे घरात पितृ दोष आहे? (Pitra dosh Symptoms)
* पितृ दोष असेलतर घरात विवाहिक जीवनात सतत तनाव किंवा भांडणे होत राहतात. पती-पत्नी मध्ये रोज भांडणे होत राहतात.
* परिवारामध्ये एकी रहात नाही घरात सतत क्लेश होत राहतात. मानसिक शांती मिळत नाही. विना कारण घरात भांडणे होत राहतात. हे एक कारण पितृ दोषाचे होऊ शकते.
* पितृ दोषा मुळे विवाहमध्ये बाधा होऊ शकते. लग्नात बऱ्याच प्रमाणात परेशानी होऊ शकतात. बरेच वेळा लग्न ठरलेले मोडते सुद्धा. मंगल कार्यामध्ये बाधा अडचणी येतात. लग्न झाल्यावर डीव्होर्स होऊ शकतो. वंश वृद्धी न होणे हा सुद्धा पितृ दोषाचा एक भाग आहे. किंवा खूप प्रयत्न करून सुद्धा संतान सुख मिळत नाही किंवा संतान झाली तर ती विकलांग होणे किंवा तिचा मृत्यु होणे.
* पितृ दोष असलेतर घरात आजारपण येतात. परिवारात सदस्य नेहमी अस्वस्थ राहतात किंवा दुर्घटनाचा शिकार बनतात.
* नोकरी व बिझनेस मध्ये नेहमी घाटा होणे तसेच कार्य क्षेत्राच्या ठिकाणी मानसिक परेशानी होणे नोकरीमध्ये बढती होत नाही.
पितृ दोष कसा नष्ट करावा ? (Pitra dosh upay)
पितृ पक्षमध्ये पूर्वजांचे नियमित विधी पूर्वक तर्पण, व श्राद्ध करावे. ब्राह्मणला जेवण व दान करावे. त्याच बरोबर वर्षातील प्रतेक एकादशी, चतुर्थी, अमावस्याच्या दिवशी जल अर्पित करावे.
पितृ शांतीसाठी रोज दुपारी पिपळच्या झाडाची पूजा करावी. पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिपळच्या झाडाला पाणी अर्पित करताना त्यामध्ये गंगाजल, काळे तीळ, दूध, अक्षता व फूल अर्पित करा. पितृ दोष शांतीसाठी हा उपाय खूप उपयोगी आहे.
पितृ पक्ष मध्ये रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा. असे रोज सुद्धा करू शकता. त्यामुळे पितृ दोष नाहीसा होतो.
कोना जरूरतमंद गरीबाला भोजन, दान द्या किंवा गरीब मुलीचा विवाह करून देण्यास मदत करा. असे केल्याने पितृ दोष नाहीसा होतो.
घरात पितरांचा फोटो दक्षिण दिशेला लावावा. आपण केलेल्या चुकांची त्यांची माफी मागावी. त्यामुळे पितृ दोषाचा प्रभाव कमी होतो.
पितृ पक्षमध्ये कोणत्या रूपात पितर घरी येतात.
पितृ पक्षमध्ये पितर पृथ्वीवर येतात. पण ते कोणत्या रूपात आपल्या दारात येतात ते समजणे कठीण आहे.
कावळा:
पितृ पक्षमध्ये घरी आलेल्या कावळ्याला हकलवून देऊ नका नाहीतर पितरांची नाराजी आपल्याला भोऊ शकेत. धार्मिक मान्यता अनुसार श्रद्धा पक्षमध्ये 15 दिवस कावळ्याच्या रूपात अन्न सेवन करतात. त्यामुळे तेच फक्त खुश होत नाहीत तर आपल्याला ते खुशाल आनंदी जीवनाचा आशीर्वाद देतात.
गरीब-जरूरतमंद:
पितृ पक्षमध्ये जर कोणी गरीब अतिथि किंवा असहाय व्यक्ति दारावर आला तर त्याचा अपमान करू नका कारणकी पितर कोणत्या सुद्धा रूपात घरी येऊ शकतात. मग त्यांच्या जेवणाची सोय करा. त्याना कधी सुद्धा रिकाम्या हातानी जाऊ देवू नका. काही तरी दान करा.
कुत्रा किवा गाय:
कुत्रा हा यमाचे रूप मानला जातो. पितृ पक्षमध्ये पंचबली भोग मध्ये कुत्रा व गाईचा सुद्धा भोग काढला जातो व ते शुभ मानले जाते. आपल्याला रस्त्यात सुद्धा भेटले तरी त्याना मारून पळवून लाऊ नका. त्यामुळे पितृच्या आत्म्याला शांती मिळते. त्याच बरोबर गाईची सेवा केल्याने पितर खुश होतात.