पितृ पक्ष 2022 इंदिरा एकादशी विशेष महत्व हे खास काम केल्यास सर्व पाप नष्ट होतील
पितृ पक्ष मधील एकादशी व्रत हे संपूर्ण वर्षातील एकादशी मध्ये विशेष महत्वाच आहे. इंदिरा एकादशी 21 सप्टेंबर 2022 बुधवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी काही खास काम केल्यास सर्व पापा पासून मुक्ती मिळते.
The text Pitru Paksha Indira Ekadashi 2022 Mahatva And What To Do in Marathi be seen on our You tube Chanel Pitru Paksha Indira Ekadashi 2022 Mahatva
पितृ पक्षा मधील इंदिरा एकादशी व्रत पितरांना मोक्ष देते. त्याच बरोबर आपल्या जीवनातील सारे पाप नष्ट होतात. पितृ पक्ष मधील इंदिरा एकादशी 21 सप्टेंबर 2022 बुधवार ह्या दिवशी असून त्याचे पारण 22 सप्टेंबर 2022 सकाळी 6 वाजून 9 मिनिट पासून 8 वाजून 35 मिनिट पर्यन्त आहे.
धार्मिक मान्यता अनुसार पितृ पक्षमध्ये काही कारणांमुळे पूर्वजांचे श्राद्ध करता नाही आले तर इंदिरा एकादशीचे व्रत जरूर करा. असे म्हणतात की इंदिरा एकादशी व्रत हे पूर्वजांचे श्राद्ध करण्या समान आहे. असे केल्याने पितरांना जन्म-मृत्यू च्या बंधनातून मुक्ती मिळते व ते खूप खुश होतात.
इंदिरा एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांना प्रसन्न करण्यासाठी रात्री विष्णु सहस्त्रनाम चा पाठ करा. व त्याच बरोबर पुढे दिलेला मंत्र 108 वेला म्हणा. असे केल्याने इंदिरा एकादशी व्रत करणाऱ्याला सर्व पापा पासून छुटकारा मिळेल.
“ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि। ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि”
इंदिरा एकादशी पूजन विधि:
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. व घरातील देवघर स्वच्छ करावे.
मग भगवान विष्णु ह्यांना गंगाजल अभिषेक करून पूजन करावे. भगवान विष्णु ह्यांना तुळस अतिप्रिय आहे. म्हणून एकादशी ह्या दिवशी त्यांना तुळस जरूर अर्पित करावी.
इंदिरा एकादशी ह्या दिवशी श्रीहरीची पूजा करताना तुळस, पिवळी फूल, व गंगाजलचा उपयोग जरूर करा. संध्याकाळी तुपाचा दिवा लाऊन ॐ वासुदेवाय नम: हा मंत्र 108 वेळा म्हणून तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्या. असे केल्याने घरात सुख शांतीचे आगमन होते.
त्याच बरोबर फूल अर्पित करून भोग दाखवावा. त्यानंतर कथा वाचावी व आरती करावी.
हिंदू धर्मामध्ये सर्व एकादशी व्रत पारायण हे खूप महत्वपूर्ण मानले जाते. इंदिरा एकादशी व्रतमध्ये पण तुळशी ग्रहण केली पाहिजे. असे म्हणतात की असे केल्या नंतरच व्रत पूर्ण होते. एकादशीच्या व्रत दिवशी भात सेवन करू नये. तसेच ज्यांनी एकादशीचे व्रत केलेले नाही त्यांनी सुद्धा भात सेवन करू नये व त्याच बरोबर व्रतधारीनि ब्रह्मचर्यचे पालन केले पाहिजे.
इंदिरा एकादशी व्रत 2022 तिथि:
हिंदू पंचांग अनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी प्रारंभ 20 सप्टेंबर 2022 मंगळवार ह्या दिवशी रात्री 9:26 मिनिट पासून सुरू होत असून समाप्ती बुधवार 21 सप्टेंबर 2022 बुधवार रात्री 11:34 मिनिट पर्यन्त आहे. पण इंदिरा एकादशी व्रत 21 सप्टेंबर 2022 बुधवार ह्याच दिवशी करावयाचे आहे. व व्रताचे पारण 22 सप्टेंबर 2022 गुरुवारी सकाळी 6:09 पासून सकाळी 08:35 च्या मध्ये करावयाचे आहे.
इंदिरा एकादशी व्रत महत्व:
शास्त्रा नुसार असे म्हणतात की संपूर्ण वर्षात 24 एकादशी येतात पण त्यामधील एक इंदिरा एकादशी ही अशी एकादशी आहे की त्याचे पुण्य पितरांना समर्पित केले जाते. असे म्हणतात की इंदिरा एकादशी चे व्रत करून भगवान विष्णु ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा केल्यास आपल्या पितरांना यमलोक मधून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो. व आपल्या जीवनात नेहमी सुख-शांती व समृद्धी मिळते.
इंदिरा एकादशी व्रत काय करावे:
इंदिरा एकादशी व्रत करताना अन्न किंवा पाणी ग्रहण न करता भगवान विष्णु ह्यांची पूजा केली पाहिजे.
विष्णुजीची पूजा करताना पूजा मध्ये पिवळी फूल, फळ, तुळशी व गंगाजल चा वापर करा.
उपवास सुरू करण्याच्या अगोदरच आधल्या दिवशी पासून सात्विक भोजन करा.
एकादशीचे व्रत झाल्यावर चांदी, तांबा, तांदूळ व दही ह्या पैकी कोणती सुद्धा एक वस्तु दान करा.
एकादशीचे व्रत करणाऱ्यानी रात्री जागरण करून विष्णु सहस्त्रनाम चा पाठ करावा.
इंदिरा एकादशी व्रत मध्ये काय करू नये:
इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्यानी खोटे बोलू नये व कोणची सुद्धा निंदा करू नये.
जर कोणी व्रत ठेवले नसेलतरी भात खाऊ नये.
मन शांत ठेवून ब्रह्मचर्य चे पालन करा.
एकादशी व्रत करणाऱ्यानी दशमी तिथी पासूनच सूर्यास्त नंतर जेवण करू नये.