शारदीय नवरात्री 2022 दुर्गा अष्टमी माताची कृपा प्राप्त करण्यासाठी हा उपाय जरूर करा
हॅप्पी नवरात्री आई दुर्गा आपणा सर्वाना सुख संपत्ति व चांगले आरोग्य देवो हीच प्रार्थना करते
पंचांग नुसार आश्विन महिन्यातील नवरात्री म्हणजे शारदीय नवरात्री होय. ह्या नवरात्री मधील अष्टमी व नवमी ही तिथी खूप खास मानली जाते. चलातर मग बघूया ह्या वर्षी शारदीय नवरात्री मधील दुर्गा अष्टमी कधी आहे.
शक्तिच्या आराधनासाठी नवरात्री हा काळ शुभ मानला जातो. म्हणजेच आश्विन महिन्यातील नवरात्री प्रतिपदा पासून नवमी पर्यन्त शारदायी नवरात्री साजरी केली जाते. ह्या वर्षी नवरात्री 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली असून 4ऑक्टोबर 2022 पर्यन्त आहे. 5 ऑक्टोबर ला दसरा साजरा करावयाचा आहे.
The text Shardiya Navratri Ashtami 2022 Matechi Krupa Prapt Honyasathi Kara He Upay in Marathi be seen on our You tube Chanel Shardiya Navratri Ashtami 2022
दुर्गा अष्टमीचे व्रत 3 ऑक्टोबर 2022 रोजी करावयाचे आहे. ह्या दिवशी माता दुर्गाच्या आठव्या रूपाची म्हणजेच महागौरी ची विधी पूर्वक पूजा करावयाची आहे. आपण आज दुर्गा अष्टमीच्या दिवशी कोणते काम करावयाचे आहे व महागौरी ला कसे प्रसन्न करावयाचे आहे. ते पाहू या.
ज्योतिष शास्त्र नुसार दुर्गा अष्टमी ह्या दिवशी कन्या पूजन करण्याचे महत्व आहे. ह्या दिवशी 9 कुमारिकांना घरी बोलवून त्यांची पूजा करून त्याना हलवा पुरी व चणे सेवन करायला देवून त्यांना भेट वस्तु द्या. असे केल्याने माता रानी प्रसन्न होऊन आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.
महागौरी ह्या दिवशी माताची कृपा मिळण्यासाठी लाल रंगाची चुनरी व त्याबरोबर काही कोईन्स व बत्तासे अर्पित करावे. असे केल्याने माता दुर्गा चे आशीर्वाद मिळतात असे म्हणतात. आपल्या जीवनातील कष्टा पासून मुक्ती मिळते. तसेच माता महागौरी चे ध्यान लाऊन पुढे दिलेला मंत्र म्हणावा.
” श्वेते वृषेसमारूढा श्वेताम्बरधरा शुचिः। महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददा “
दुर्गा अष्टमी ह्या दिवशी माता महागौरीला श्रीफळचा भोग अर्पित करणे शुभ मानले जाते. अष्टमी ह्या तिथीला नारळाची मिठाई भोग म्हणून ठेवावी व मग प्रसाद म्हणून सर्वांना वाटावी.
पुढच्या विडियो मध्ये नवरात्री अष्टमीचे महत्व पूजा व कन्या पूजन कसे करायचे पाहू या