धनत्रयोदशी 2022 पूजा शुभ मुहूर्त पूजाविधी मंत्र व महत्व
हिंदू धर्मामध्ये दिवाळी ह्या सणाचे खूप महत्व आहे. प्रेतक जण वर्षभर दिवाळी ह्या सणाची वाट पाहत असतो. अगदी धूमधामीत ह्या सणाची सुरवात धनत्रयोदशी ह्या दिवसा पासून होते. धनत्रयोदशी म्हणजे छोटी दिवाळी होय.
हिंदू पंचांग नुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथीवर धनत्रयोदशी हा दिवस साजरा केला जातो. ह्या दिवशी धन्वंतरि देव, लक्ष्मी माता व कुबेर देव ह्याची पूजा केली जाते. ह्या दिवशी कोणती सुद्धा वस्तु खरेदी करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी कोणती सुद्धा खरेदी केलेली वस्तु 13 गुणांनी वाढते. म्हणूनच लोक भांडी खरेदी बरोबर सोने-चांदी सुद्धा खरेदी करतात.
The text Dhanteras 2022 Puja Muhurat Puja Vidhi V Mahatva in Marathi be seen on our You tube Chanel Dhanteras 2022 Puja Muhurat Puja Vidhi V Mahatva
चला तर मग बघू या धनत्रयोदशी तिथी, पूजाविधी, महत्व व मंत्र काय आहे.
धनत्रयोदशी कधी आहे:
पंचांग अनुसार ह्या वर्षी धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रविवार ह्या दिवशी आहे. धनत्रयोदशी ह्या दिवशी कुबेर भगवान ह्यांची पूजा केली जाते. त्याच बरोबर ह्या दिवशी सोने चांदी व भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते.
धनत्रयोदशी 2022 शुभ मुहूर्त:
कार्तिक माह कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथि प्रारंभ – 22 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 6 वाजून 02 मिनट पासून
त्रयोदशी तिथि समाप्त – 23 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 6 वाजून 03 मिनट पर्यन्त
धन्वंतरि देवाची पूजा शुभ मुहूर्त – 23 ऑक्टोबर 2022 रविवार, 5 वाजून 44 मिनट पासून 06 वाजून 05 मिनट पर्यन्त
धनत्रयोदशी पूजा विधि:
धनत्रयोदशी ह्या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्तवर उत्तर दिशेला भगवान कुबेर व भगवान धन्वंतरि ह्यांची स्थापना करा.
त्याच बरोबर माता लक्ष्मी व श्री गणेश भगवान ह्यांची सुद्धा मूर्ती किंवा फोटो ठेवा. मग दिवा अगरबत्ती लाऊन विधी पूर्वक पूजा करा.
मग गंध अक्षता फुले अर्पित करा. त्यानंतर कुबेर भगवान ह्याना पांढरी मिठाई व भगवान धन्वंतरि ह्यांना पिवळ्या रंगाची मिठाई भोग म्हणून दाखवा.
पूजा करताना पुढे दिलेला मंत्र सारखा म्हणा:
“ ॐ ह्रीं कुबेराय नमः”
भगवान धन्वंतरि ह्याना प्रसन्न करण्यासाठी धन्वंतरि स्त्रोत्रचे वाचन जरूर करा.
धनत्रयोदशीचे महत्व:
पौराणिक मान्यता अनुसार समुद्र मंथनच्या वेळी भगवान धन्वंतरि हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. म्हणून ह्या दिवशी भगवान धन्वंतरि ह्यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी, धन कोषाध्यक्ष कुबरे व भगवान धन्वंतरि ह्यांची पूजा करतात. असे म्हणतात की ह्या दिवशी विधी पूर्वक पूजा अर्चा केल्यास घरात कधी सुद्धा कमी होत नाही. ह्या दिवशी भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे.