आपणा सर्वांना दिवाळीच्या व धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशी धनतेरस 2022 रात्री ह्या ठिकाणी जरूर दिवा लावा भगवान कुबेर व लक्ष्मी माता ह्यांची कृपा मिळेल
धनतेरस 2022 शुभ मुहूर्त:
कार्तिक माह कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथि आरंभ – 22 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 6.02 पासून
कार्तिक माह कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथि समाप्त – 23 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 6.03 पर्यन्त
धनवंतरी देव पूजन शुभ मुहूर्त – 23 अक्टूबर 2022 रविवार, 5.44 PM – 06.05 PM पर्यन्त
शुभ मुहूर्त कालावधी – 21 मिनट
प्रदोष काल: 5.44 PM – 8.16 PM
The text Dhanteras 2022 Ratri Hhya Thikani Diva Lava Bhagwan Kuber Yanchi Krupa Milel in Marathi be seen on our You tube Chanel Dhanteras 2022 Ratri Hhya Thikani Diva Lava Bhagwan Kuber Yanchi Krupa Milel
हिंदू धर्मा नुसार धनत्रयोदशी ह्या दिवसाचे खूप महत्व आहे. असे म्हणतात की धनत्रयोदशी ह्या दिवशी लक्ष्मी माताची पूजा केल्यास घरात धन सुख-समृद्धी येते. ह्या दिवशी धनाचे देवता कुबेर ह्यांची पूजा केली जाते. दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्ष त्रयोदशी ह्या दिवशी धनत्रयोदशीची पूजा केली जाते. ह्या वर्षी धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रविवार ह्या दिवशी आहे. धनत्रयोदशी ह्या दिवशी आरोग्यचे देवता भगवान धनवंतरी ह्यांचा जन्म झाला होता. धनत्रयोदशी ह्या दिवशी चांगले आरोग्य सुद्धा प्राप्त होते.
पौराणिक कथा अनुसार धनत्रयोदशी ह्या दिवशी आपण जर विशेष स्थानानवर जर दिवा लावला तर आपली आर्थिक स्थिति सुधारू शकते व कधी सुद्धा कशाची कमी होत नाही.
आता आपण पाहू या धनत्रयोदशी ह्या दिवशी कोण कोणत्या जागी दिवा लावायचा आहे:
पिंपळाच्या झाडाजवळ:
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या खाली दिवा जरूर लावावा. असे म्हणतात की पिंपळाच्या झाडांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. व धनत्रयोदशी ह्या दिवशी दिवा लावला तर जीवनात कधी सुद्धा धनाची कमतरता होत नाही.
बेलाचे झाड:
जर धना संबंधित परेशान आहात किंवा धनाची कमतरता आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री बेलच्या झाडाच्या खाली दिवा लावावा. पण दिवा तुपाचा लावावा. असे म्हणतात की असे केल्याने धन व सुख समृद्धीमध्ये नेहमी वृद्धी होते.
शमशान घाट:
धनत्रयोदशी च्या दिवशी रात्री शमशान घाटवर जाऊन एक दिवा लावायचा आहे त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल.
मुख्य दरवाजावर:
धनत्रयोदशी च्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर दिवा जरूर लावावा. असे केल्याने माता लक्ष्मी घरात प्रवेश करते. जेथे माता लक्ष्मी वास करते तेथे धन संपत्ति कधी सुद्धा कमी होत नाही. म्हणूनच धनत्रयोदशी च्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा.
पूजा घर:
धनत्रयोदशी हा दिवस सुख समृद्धीचे पर्व मानले जाते. ह्या दिवशी पूजाघर मध्ये दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. घरातील पूजाघर मध्ये दिवा लावल्यास वास्तु दोष नष्ट होतो. व आर्थिक समृद्धी येते.
उत्तर-पूर्व दिशा:
धनत्रयोदशी च्या दिवशी घरातील उत्तर पूर्व ह्या दिशेला तुपाचा दिवा लावावा. दिव्यामद्धे कापसाची वात लावण्याच्या आयवजी लाल रंगाचा धागा वापरावा. दिवा जमिनीवर न ठेवता तांदूळ ठेवून त्यावर ठेवावा.
यमासाठी:
यमासाठी जो दिवा लावायचा आहे तो संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला लावायचा आहे. पण तो दिवा घरी गव्हाचे पीठ व त्यामध्ये थोडीशी हळद घालून पीठ घट्ट भिजवून त्याचा पणतीच्या आकाराचा दिवा बनवून त्यामध्ये तेल व वात घालून एका प्लेटमध्ये ठेवून त्याची पूजा करून मग लावायचा आहे. त्यामुळे घरात आकस्मित मृतू होणार नाही.
डिसक्लेमर
ह्या लेखात दिलेली माहिती आम्ही फक्त तुमच्या पर्यन्त पोचवत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी घेत नाही.