आपणा सर्वांना दिवाळीच्या व लक्ष्मी पूजनच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळी लक्ष्मी पूजन 2022 शुभ मुहूर्त व करा हे सोपे उपाय माता लक्ष्मीची नेहमी राहील कृपा
दिवाळी जीवनातील सुख समृद्धी व माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळण्यासाठी वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळीहा सण 5 दिवस चालतो. धनतेरस किंवा धनत्रयोदशी ह्या दिवसा पासून दिवाळी हा सण सुरू होतो. दिवाळी हा सण संपूर्ण देशात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षच्या अमावस्या ह्या तिथीला अगदी धूम धडाक्यात साजरा केला जातो.
The text Diwali Lakshmi Pujan 2022 Kara He Upay Mata Lakshmi Hoil Prasnn in Marathi be seen on our You tube Chanel Diwali Lakshmi Pujan 2022 Kara He Upay Mata Lakshmi Hoil Prasnn
लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त:
लक्ष्मी-गणेश पूजन शुभ मुहूर्त संध्याकाळी 06 वाजून 54 मिनट पासून 08 वाजून 16 मिनट पर्यन्त
लक्ष्मी पूजन अवधि – 1 तास 21 मिनट
प्रदोष काळ संध्याकाळी 05 वाजून 42 मिनट पासून रात्री 08 वाजून 16 मिनट पर्यन्त
वृषभ काळ संध्याकाळी 06 वाजून 54 मिनट पासून रात्री 08 वाजून 50 मिनट पर्यन्त
दिवाली लक्ष्मी पूजा महा शुभ काळ मुहूर्त:
लक्ष्मी पूजा मुहूर्त्त रात्री 11 वाजून 40 मिनट पासून 12 वाजून 31 मिनट पर्यन्त
अवधि – 50 मिनट
दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी व श्री गणेश ह्यांची विशेष पूजा अर्चा केली जाते. असे म्हणतात की दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी प्रकट झाली होती. जय घरात साफ सफाई, सजावट व माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांची पूजा व मंत्र जाप केला जातो तेथे माता लक्ष्मीचा वास असतो.
दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा शुभ मुहूर्तवर करणे लाभ दाय आहे. असे म्हणतात की दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचे उपाय केलेतर जीवनात नेहमी सुख समृद्धी येते.
लक्ष्मी पूजनसाठी काही सटीक उपाय आहेत. हे उपाय केले तर लक्ष्मी माता प्रसन्न होईल:
कवड्या व गोमती चक्र:
माता लक्ष्मी आपल्या जीवनात सुख समृद्धी व संपन्नता प्रदान करणारी देवी आहे. माता लक्ष्मीला काही वस्तु अतिप्रिय आहेत. त्यामध्ये कवड्या (कौड़ी) व गोमती चक्र प्रमुख आहेत. दिवाळी लक्ष्मी पूजनमद्धे जो भक्त पूजेमद्धे 5 पिवळ्या कवड्या व गोमती चक्र ठेवेल त्या भक्तावर लक्ष्मी माताची विशेष कृपा राहील.
लक्ष्मी पूजन्च्या दुसऱ्या दिवशी कवड्या व गोमती चक्र एका लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने माता लक्ष्मीचा वर्षभर आशीर्वाद मिळतो व घरात सुख समृद्धीचा वास राहतो.
चांदीचे कॉईन व हळकुंड:
लक्ष्मी पूजामध्ये चांदीचे कॉईन व हळकुंड आपल्या पूजेमध्ये ठेवल्यास आपल्या जीवनात उन्नती होऊन सुख शांती मिळते.
मुख्य दरवाजावर करा हे उपाय:
दिवाळी लक्ष्मी पूजनमध्ये कवड्या जरूर ठेवा. मग पूजा झाल्यावर लाल कापडात बांधून मुख्य दरवाजावर लटकवून ठेवा. असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व अपार धन दौलत प्राप्त होते. त्याच बरोबर वास्तु दोष असेलतर तो सुद्धा निघून जातो.
दिवाळीच्या दिवशी श्रीयंत्र व महालक्ष्मी यंत्र:
दिवाळीच्या शुभ मुहूर्तवर लक्ष्मी पूजनच्या दिवशी श्रीयंत्र व महालक्ष्मी यंत्र स्थापित करा. असे म्हणतात की श्रीयंत्र व महालक्ष्मी यंत्र स्थापित केलेतर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते.
झाड़ू चे उपाय:
माता लक्ष्मी ला साफ सफाई व सुंदरता खूप प्रिय आहे. त्यामुळेच माता लक्ष्मी त्या घरात नेहमी वास करते. शास्त्रानुसार माता माता लक्ष्मीला झाडू अतिप्रिय आहे. झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो.
आर्थिक परेशानी दूर करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी झाडू खरेदी करून आपल्या घरातील देवघरात ठेवा. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्याला आर्थिक परेशानी पासून नेहमी दूर ठेवेल.