करवा चौथ 2022 आपल्या राशी नुसार घाला खास रंगाच्या बांगड्या माता होईल प्रसन्न
करवा चौथ हे व्रत धर्मिक कारणांसाठी नाहीतर पती-पत्नी ह्याच्या आपसातील प्रेमाचे प्रतीक साठी सुद्धा आहे. करवा चौथ हे व्रत महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयूषासाठी करतात.
करवा चौथ 2022 13 ऑक्टोबर 2022 गुरुवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी विवाहित महिला संपूर्ण दिवस निरंकार उपवास करतात व रात्री चंद्र दर्शन झाल्यावर आपल्या पतीचे दर्शन घेऊन मग उपवास सोडतात. ह्या दिवशी विवाहित महिला हाताला मेंदी लाऊन 16 शृंगर करतात.
The text Karwa Chauth 2022 Rashi Nusar Ghala Khas Rangachya Bangdya Mata Hoiel Prasann in Marathi be seen on our You tube Chanel Karwa Chauth 2022 Bangles
शास्त्रानुसार करवा चौथ ह्या दिवशी महिला जर आपल्या राशी नुसार खास रंगाच्या बांगड्या घालतील तर माता रानी प्रसन्न होईल. चला तर मग आपण पाहूया कोणत्या राशीच्या महिलानी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या:
मेष:
करवा चौथ ह्या दिवशी महिलांनी लाल किंवा गोल्डन रंगाच्या बांगड्या घालाव्या. ज्योतिष शास्त्र नुसार लाल रंग मेष राशीसाठी शुभ आहे.
वृषभ:
करवा चौथ ह्या दिवशी महिलांनी सिल्व्हर किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्या. असे म्हणतात की त्यामूळे पति-पत्नी मधील प्रेम वाढते.
मिथुन:
बुध ग्रह हा मिथुन राशीचा स्वामी आहे. बुध ग्रहला हिरवा रंग खूप प्रिय आहे. म्हणून मिथुन राशी असणाऱ्या महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या. पूजेमद्धे हिरवा रंग शुभ मानला जातो.
कर्क:
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. पांढरा रंग हा चंद्राचे प्रतिनिधित्व करतो. पण करवा चौथ ह्या दिवशी पांढऱ्या रंगाचा वापर करू नये. मग लाल रंगाच्या बांगड्या बरोबर पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालाव्या.
सिंह:
सिह राशीच्या स्त्रिया नारंगी, किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालू शकतात. त्यामुळे करवा लवकर प्रसन्न होते व सौभाग्यवतीचा आशीर्वाद देते.
कन्या:
कन्या राशीच्या स्त्रियांनी करवा चौथच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या त्यामुळे वैवाहिक जीवन नेहमी हरा-भरा राहते. व त्याच बरोबर संतान सुखाची प्राप्ती होते.
तूळ:
तूळ राशीचे स्वामी शुक्र आहे. ह्या राशीच्या स्त्रियांनी गोल्डन व सिल्वर रंगाच्या बांगड्या घालाव्या. त्यामुळे व्रताचे शुभ फळ प्राप्त होईल.
वृश्चिक:
वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी मरून किंवा गोल्डन रंगाच्या बांगड्या घालाव्या. त्यामुळे वैवाहिक जीवनात कधीसुद्धा दुरावा येणार नाही.
धनू:
धनू राशीचा स्वामी बृहस्पति आहे. करवा चौथ च्या दिवशी ह्या राशीच्या महिलांनी पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालाव्या. त्यामुळे प्रेम संबंधात मधुरता येईल व संतान प्राप्तीचा वरदान मिळेल.
मकर:
मकर राशीच्या महिलांनी मिळया रंगाच्या बांगड्या घालाव्या. त्यामुळे वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.
कुंभ:
कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. शनिला निळा व काळा रंग प्रिय आहे. पण काळा रंग करवा चौथ ह्या दिवशी घालू नये म्हणून निळ्या किंवा सिल्व्हर रंगाच्या बांगड्या घालाव्या.
मीन:
मीन राशीच्या महिलांनी करवा चौथच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या किंवा गोल्डन रंगाच्या बांगड्या घालाव्या त्याचे चांगले शुभ परिमाण मिळतील.