करवा चौथ 2022 महत्व कथा व व्रतच्या दिवशी चिकून सुद्धा ही कामे करू नका नाहीतर होईल मोठे नुकसान
करवा चौथ हे व्रत धर्मिक कारणांसाठी नाहीतर पती-पत्नी ह्याच्या आपसातील प्रेमाचे प्रतीक साठी सुद्धा आहे. करवा चौथ हे व्रत महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयूषासाठी करतात.
करवा चौथ हे व्रत उत्तर भारतीय स्त्रीयांसाठी खूप महत्वाचा सण आहे. भारतात खास करून पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश व राजस्थान ह्या ठिकाणी जास्त करून करतात.
The text Karwa Chauth 2022 Vrat Chya Divashi Chukun Sudha Hi Kam Karu Naka Nahiter Hoil Mothe Nuksan in Marathi be seen on our You tube Chanel Karwa Chauth 2022 Mahatav Katha
ह्या वर्षी करवा चौथ 2022 13 ऑक्टोबर 2022 गुरुवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी विवाहित महिला संपूर्ण दिवस उपवास करतात व रात्री चंद्र दर्शन झाल्यावर आपल्या पतीचे दर्शन घेऊन मग उपवास सोडतात. ह्या दिवशी विवाहित महिला हाताला मेंदी लाऊन साजशृंगर करतात.
करवा चौथ ह्या दिवशी पुढील सांगितलेल्या गोष्टी आजिबात करू नका कारणकी त्यामुळे आपल्या पतीचे आयुष कमी होऊन आपल्या विवाहिक जीवनात त्याचा प्रभाव पडू शकतो. चला त मग आपण पाहूया करवा चौथ ह्यादिवशी विवाहिक महिलांनी कोणती कामे करू नयेत.
करवा चौथ ह्या दिवशी ही कामे करू नका:
* करवा चौथ व्रत ह्या दिवशी महिलांनी काळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करू नये कारण की काळे व पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जात नाही.
* करवा चौथ ह्या दिवशी घरातील कोणी सदस्य जर झोपलेला असेलतर त्यांना उठवू नये. कारणकी करवा चौथ च्या दिवशी झोपलेल्या व्यक्तिला उठवणे अशुभ मानले जाते.
* करवा चौथ ची कथा आईकल्यावर कीर्तन आवश्य करा. कोणा बद्दल चुगली किंवा निंदा किंवा अपशब्द बोलू नका.
* करवा चौथ ह्या दिवशी कात्रीचा वापर करू नका. कारणकी ह्या दिवशी कात्री वापरणे अशुभ मानले जाते.
* करवा चौथ ह्या दिवशी माता- पिता, सासू-सासरे किंवा मोठ्या व्यक्तीचा अपमान करू नये. जर असे केलेतर व्रताचे पूर्ण फल प्राप्त होत नाही. व मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद सुद्धा मिळत नाही.
* करवा चौथ च्या दिवशी सौभाग्यचे सामान घराच्या बाहेर फेकू नका कारण की ह्या दिवशी त्याच सामानाची जास्त आवशकता असते.
* करवा चौथ च्या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रीनी झोपले नाही पाहिजे कारण झोपणे हे अशुभ मानले जाते.
* करवा चौथच्या दिवशी पतीशी भांडू नका जर आपले पती बरोबर भांडण झालेतर तुम्ही तुमच्या पापात भागीदार होताल.
* करवा चौथच्या दिवशी आपल्या पतीच्या सर्व आज्ञा मान्य करा कारण की त्या आवश्यक आहे.
* करवा चौथ च्या दिवशी श्रृंगार करण्याचे सामान कोणाला सुद्धा देवू नका किंवा दान करू नका किंवा कोणाचे सुद्धा सामान वापरू नका किंवा घेऊ नका.
करवा चौथ व्रत महत्त्व (Importance of Karva Chauth Fast)
करवा चौथ हे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुषसाठी करतात. आपल्या जीवनातील कष्ट दूर होतात. त्याच बरोबर आपल्या पतीला दीर्घ आयुष प्राप्त होते.
करवा चौथ ह्या दिवशी शंकर, पार्वती, गणेश, कार्तिक व चंद्रची पूजा करतात. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अध्य दिल्यावर पूजा करावी. पूजा झाल्यावर एका थालीमद्धे मातीचे भांडे, तांदूळ, उदीडदाळ व सौभाग्य अलंकार आपल्या सासुला किंवा घरातील सुहागन महिलेला त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेऊन ते सामान त्याणा भेट म्हणून द्या.
करवा चौथ कथा (Karva Chauth Katah)
महाभारतातील पौराणिक कथा नुसार पांडव पुत्र अर्जुन तपस्या करण्यासाठी निलगिरी पर्वतावर गेले असता बाकी पांडवांवर बऱ्याच प्रकारची संकट येतात. मग अर्जुनची पत्नी द्रौपदी भगवान श्रीकृष्ण ह्याना उपाय काय करावा असे विचारले असता श्री कृष्ण ह्यांनी कार्तिक चतुर्थी च्या दिवशी करवा चौथ चे व्रत करावे असे सुचवले व ते व्रत केल्यास सर्व संकट दूर होतील.
श्रीकृष्ण ह्यांनी करवा चौथचे व्रत सांगितल्यावर द्रौपदी ते व्रत ठेवते त्यामुळे त्यांचे सर्व कष्ट दूर होतात.