सूर्य ग्रहण 2022 च्या प्रभावा पासून वाचण्यासाठी सोपे सटीक उपाय करा
25 ऑक्टोबर 2022 मंगळवार ह्या दिवशी 2022 मधील शेवटचे आंशिक सूर्य ग्रहण आहे. हिंदू पंचांग अनुसार आंशिक सूर्य ग्रहण दुपारी 2 वाजून 28 मिनिट पासून संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिट पर्यन्त आहे. ह्या ग्रहणाचा कालावधी 4 तास आहे.
The text Surya Grahan 2022 Upayin Marathi be seen on our You tube Chanel Surya Grahan 2022 Upay
दिवाळी 2022 बरोबर 1 दिवसा नंतर सूर्य ग्रहण आहे त्याच्या चांगला किंवा वाईट प्रभाव प्रतेक राशीवर होणार आहे म्हणजेच होत असतो.
ग्रहण काळानंतर सूतक काळ सुरू होतो. तेव्हा कोणतीसुद्धा महत्वपूर्ण काम किंवा कार्य केले जात नाही. ज्योतिष शास्त्र नुसार असे म्हणतात की शुभ ग्रहांची दिशा बदलते व त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. मग अश्या वेळेस ग्रहणाच्या प्रभावा पासून वाचण्यासाठी काही सोपे सटीक उपाय आहेत.
सूर्य ग्रहणच्या प्रभावा पासून वाचण्यासाठी करा हे उपाय:
1. सूर्य ग्रहणच्या काळात व्यक्तीने सारखे देवाचे स्मरण केले पाहिजे व त्याच बरोबर आपले जीवन सुख समृद्धीचे जावे म्हणून प्रार्थया केली पाहिजे.
2. सूर्य ग्रहणच्या कालावधीमध्ये दे-देवतांचे बीज मंत्र व चाळिसाचे वाचन करावे त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव कमी होतो. मंत्र जाप करताना लक्षात ठेवा की तो मनातल्या मानत करावा. त्याच बरोबर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की देवांच्या फोटोला किंवा मूर्तीला हात लावू नये.
3. सूतक संपल्यावर स्नान जरूर करावे. मग देवी देवतांच्यावर व अन्नावर व घरात गंगाजल शिंपडावे असे केल्याने ग्रहणाचा प्रभाव कमी होतो.
4. त्याच बरोबर शास्त्रा मध्ये असे सांगितले आहेकी ग्रहण काळ मध्ये दिवा लाऊन गायत्री मंत्र अथवा महामृत्युंजय मंत्र जाप जरूर करावा. त्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्या पासून दूर ठेवले जाते.
5. ग्रहण काळामध्ये सूतक चालू झाल्यावर जेवण किंवा खाणे पिणे किंवा स्नान इ पासून दूर राहिले पाहिजे. त्याच बरोबर झोपले सुद्धा नाही पाहिजे. समजा असे केले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडू शकतो.
6. त्याच बरोबर सूर्य ग्रहण च्या काळात तुळशीच्या रोपाला जपले पाहिजे त्यासाठीसूतक काळामध्ये तुळशीच्या रोपाला एखाद्या स्वच्छ मलमलच्या कापड घेऊन झाकले पाहिजे. व तुळशीच्या रोपाला हात नाही लावला पाहिजे. उलट ग्रहण चालू होण्याच्या आता राहिलेले जेवण फ्रीजमध्ये ठेवून त्यावर तुळशी पत्र ठेवावे. असे केल्याने ग्रहणचा वाईट परिमाण जेवणावर होत नाही.
डिसक्लेमर- ह्या लेखात दिलेली माहिती आम्ही फक्त आपल्यापर्यंत पोचवत आहोत त्याची कोणतीसुद्धा हमी आम्ही घेत नाही.