10 बेस्ट होंममेड फेस पॅक बनवून चमकती त्वचा मिळवा
त्वचेवर जर चकाकी असेलतर आपोआपच आपली त्वचा स्वस्थ राहते. कहर म्हणजे बऱ्याच पद्धती आहेत त्याने आपली त्वचा ग्लो होऊ शकते. त्यासाठीच आम्ही ह्या लेखात आपली स्कीन ग्लो काशी करायची म्हणजेच त्यासाठी कोणते फेस पॅक आहेत ते आपण पाहू या. आपण बाजारातील कितीतरी कॉस्मेटिक वापरतो पण आपले पूर्वीच्या काळापासून चालत आलेले होंममेड फेस पॅकची मज्जाच काही निराळी असते. त्यासाठीच आम्ही विविध प्रकारचे घरगुती फेस पॅक कसे बनवायचे ते आपण पाहू या.
The text 10 Homemade Face Packs for Glowing Skin in Marathi be seen on our You tube Chanel 10 Homemade Face Packs for Glowing Skin
ग्लोइंग त्वचा साठी घरगुती उपाय के आहेत. पण त्यासाठी प्रथम आपला आहार व्यवस्तीत पाहिजे बरेच वेळा कळत नकळत आपल्या आहारामध्ये बदल झाला की त्याचा परिणाम आपल्या स्कीनवर होतो.
प्रदूषण:
प्रदूषणचा परिणाम आपल्या स्कीनवर होतो म्हणजे स्किन एजिंग, एक्जिमा किंवा पिंपल्स होय. त्याच बरोबर सूर्याची हानिकारक किरणे त्यामुळे स्कीनवर सुरकुत्या, डाग व स्कीन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो.
पुरेशी झोप:
ताजेतवाने राहण्यासाठी झोप पूर्ण झाली पाहिजे. जर आपली झोप पुरी झालीनाहीतर त्याचा परिणाम आपल्या स्कीनवर होतो व रक्त प्रवाह कमी होतो व त्याचा परिणाम चेहऱ्यावर होतो.
तनाव:
तनाव म्हणजेच स्ट्रेस आपल्या स्कीनसाठी हानिकारक आहे. तवान मुळे आपल्या स्कीनच्या समस्या पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे त्वचा काळवंडते.
पाण्याची कमतरता:
पाणी कमी सेवन केलेतर आपल्या स्कीनच्या समस्या होऊ शकतात. पाण्यामुळे आपली स्कीन मॉइस्चराइज होते. त्यामुळे त्वचा स्वस्थ राहते. म्हणूनच पाण्याचे सेवन भरपूर करा.
कॉस्मेटिक प्रोडक्ट:
महिला बाजारातील महागडी विविध कॉस्मेटिक उत्पादने वापरत असतात. त्याच्या जास्तीच्या वापरामुळे आपली स्कीन प्रभावी होते. कॉस्मेटिक प्रोडक्टस मधील केमिकल्स त्वचेला नुकसान दायक होतात.
सुंदर ग्लोइंग स्किनसाठी घरगुती फेस पॅक अगदी सोपे उपाय:
1. पोपईचा फेस पॅक:
साहित्य: 1/2 वाटी पोपईचा गर, 1/2 टी स्पून चंदन पावडर, आवश्यकतानुसार गुलाब पाणी
कृती: पोपईचा गर एका बाऊलमद्धे घेऊन त्यामध्ये चंदन पावडर मिक्स करून आवश्यकतानुसार गुलाब पाणी घालून पॅक तयार करा. मग हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावून 15-20 मिनिट तसेच ठेवा. मग फेस पॅक सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवावा. असे आपण आठोडयातून 2-3 वेळा करू शकता.
2. केशर:
साहित्य: 2-3 केशर काडी, 2 चमचे दूध व कापूस
कृती: 2 तास केशर दुधामद्धे भिजत ठेवा. मग ते दूध कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. मग थोडा वेळ तसेच राहू देवून मग पाण्यानि चेहरा धुवावा.
3. मुलतानी माती:
साहित्य: 1 चमचा मुलतानी माती, 1 चमचा एलोविरा (बाजारात मिळते) व 1 चमचा दही
कृती: एका बाऊलमद्धे सर्व साहित्य घेऊन त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी. पण चेहऱ्यावर लावताना नीट काळजीपूर्वक लावा डोळ्यात जाता कामा नये. मग सुकल्यावर चेहरा धुवावा.
4. गुलाब फेस पैक
साहित्य: 1 कप गुलाबाच्या पाकळ्या, 1 1/2 चमचा मध्
कृती: गुलाबाच्या पाकळ्या वाटून घ्या. मग त्यामध्ये मध् मिक्स करून त्याची पेस्ट बनवा व चेहऱ्यावर लावा सुकल्यावर पाण्यांनी धुवा.
5. नारियल तेल:
साहित्य: 2 चमचे नारळाचे तेल, 1 चमचा मध, 1 चमचा दही
कृती: एका बाऊलमद्धे सर्व साहित्य घेऊन मिक्स करून ते आपल्या चेहऱ्यावर व मानेवर लावावे. मग 15 मिनिट तसेच ठेवून धुवावे.
6. दही फेस पॅक:
साहित्य: 3 स्पून दही, 1 स्पून मध, 1 स्पून लिंबुरस
कृती: सर्व साहित्य एका बाऊलमद्धे मिक्स करून घ्या. मग चेहऱ्यावर लाऊन 10-15 मिनिट तसेच ठेवून मग चेहरा स्वच्छ धुवावा.
7. एलोवेरा जेल
साहित्य: 1 चमचा एलोवेरा जेल, 1 चमचा मध, 1 चिमूट हळद, थोडेसे गुलाब पाणी
कृती: एका बाऊलमद्धे सर्व साहित्य मिक्स करून चेहरा व मानेवर लाऊन 20 मिनिट नंतर कोमट पाण्यांनी चेहरा स्वच्छ धुवावा.
8. लिंबूचा फेस पॅक:
साहित्य: अर्धे लिंबू, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मध
कृती: एका बाऊलमद्धे मध, हळद, व लिंबुरस मिक्स करून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लाऊन हलक्या हातानी हळुवारपणे मालीश करा. मग 10 मिनिट झाल्यावर थंड पाण्यांनी चेहरा धुवावा.
टीप: लिंबुरस डायरेक्ट चेहऱ्यावर लाऊ नका. प्रथम एका ठिकाणी टेस्ट करून पहा मगच लावा.
9. ओटमील:
सामग्री: 2 चमचे दलिया किंवा ओटमिल, 1 चमचा चंदन पावडर, गुलाबपाणी
कृती: एका बाऊलमद्धे सर्व साहित्य मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. पेस्ट बनवताना थोडीशी दाटच बनवा. मग चेहऱ्यावर लाऊन 15 मिनिट झाले की सुकत आली की थोडेसे पाणी वापरुन स्क्रब करत मालीश करत धुवून टाका. असे आठोडयातून दोन वेळा केले तरी चालते.
10. काकडीचा फेस पॅक:
साहित्य: 1/4 काकडी व 1 चमचा एलोवेरा जेल
कृती: काकडी चिरून घेऊन त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये एलोवेरा जेल मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. मग चेहऱ्यावर लाऊन 15 मिनिट तसेच ठेवा मग चेहरा स्वच्छ धुवावा. असे एक दिवसाआड केले तरी चालते.