खग्रास चंद्र ग्रहण2022 काय करावे काय करू नये संपूर्ण माहिती
चंद्र ग्रहणमध्ये चुकूनसुद्धा करू नका किंवा करा ही काम
खग्रास चंद्र ग्रहण ह्या वर्षातील शेवटचे 8 नोव्हेंबर 2022 मंगळवार कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी आहे. चंद्र ग्रहण हे अशुभ मानले जाते म्हणूनच चंद्र ग्रहण काळात काही काम करण्यास मनाई आहे. सूर्य ग्रहण असो किंवा चंद्र ग्रहण काळात कोणते सुद्धा शुभ कार्य केले जात नाही. त्याच बरोबर अजून काही कार्य केले जात नाही.
The text Chandra Grahan 2022 Kay Karave Kay Karu Naye Sampurn Mahiti in Marathi be seen on our You tube Chanel Chandra Grahan 2022
चंद्र ग्रहणच्या काळात काय करावे? (What To Do During Eclipse)
धार्मिक मान्यता अनुसार चंद्र ग्रहणच्या काळात गायत्री मंत्र किंवा आपल्या ईष्ट देवताचा मंत्र जाप करणे शुभ मानले जाते. चंद्र ग्रहण पूर्णिमा ह्या दिवशी सुरू होत आहे. पूर्णिमाच्या दिवशी मंत्र जाप व दान धर्म करण्याचे विशेष महत्व आहे.
ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर खाण्याच्या वस्तुमध्ये व पाण्यामध्ये तुळशी पत्र टाकले जाते. असे म्हणतात की असे केल्याने खाण्या पिण्याच्या वस्तुवर ग्रहणाच्या नकारात्मक शक्तिचा प्रभाव होत नाही.
असे म्हणतात की ग्रहण समाप्त झाल्यावर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल व तुळशी पत्र घालून स्नान करावे. त्यानंतर दान धर्म करायची पद्धत आहे. त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते.
धार्मिक मान्यता अनुसार ग्रहण काळात तोंडात तुळशी पत्र ठेवून हनुमान चालीसाचे पठन करणे शुभ मानले जाते.
ग्रहण काळात काय करू नये? (What Not Do During Eclipse)
धार्मिक मान्यता अनुसार ग्रहण काळात जेवण बनवणे किंवा जेवण करणे करू नये. कारण ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त असतो. म्हणूनच ग्रहण काळात हे काम करू नये.
चंद्र ग्रहणच्या काळात गर्भवती महिलानी घराच्या बाहेर पडू नये. असे म्हणतात की त्यामुळे गर्भावर ग्रहणाची नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव पडतो.
ग्रहण काळात गर्भवती महिलानी टोकदार वस्तु किंवा धारदार वस्तुचा वापर करणे टाळावे.
मान्यता अनुसार ग्रहण काळात स्वस्थ व्यक्तिनी झोपने अशुभ मानले जाते. त्याच बरोबर ग्रहण काळात झाडांना फुलांना हात लावू नये.
मान्यता अनुसार ग्रहणच्या काळात देवाची पूजा करू नये किंवा घरातील मंदिर उघडे ठेवू नये.
चंद्र ग्रहण काळात लहान मुलांना घरच्या बाहेर पडू देवू नये किंवा त्यांना एकट्याने ग्रहण पहाण्याची अनुमति देवू नये.
चंद्र ग्रहण सूतक कधी सुरू होत आहे?
चंद्र ग्रहणचे सूतक सकाळी 9 वाजून 21 मिनिटांनी सुरू होत असून संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिट ह्या वेळेला समाप्त होत आहे.
हिंदू धर्माच्या मान्यता अनुसार असे म्हणतात की ग्रहण काळात देवी शक्तिचा प्रभाव कमी होऊन असुरी शक्तिचा प्रभाव वाढत असतो. म्हणूनच ग्रहण काळात पूजा पाठ करण्यास मनाई करतात. ग्रहण काळात मौन धारण करून मंत्र जाप केला पाहिजे. त्याच बरोबर ग्रहण काळात पृथ्वीच्या वायु मंडल मध्ये हानिकारक किरणांचा प्रभाव जास्त असतो. म्हणूनच ह्या काळात खाणे-पिणे वर्ज असते.
चंद्र ग्रहण सूतक काल (Chandra Grahan 2022 Sutak Kal)
हिंदू धर्मा नुसार चंद्र ग्रहण काळचा सूतक काळ ग्रहण लागण्याच्या अगोदर 9 तास सुरू होतो. ह्या वर्षांमधील भारतातील हे दुसरे चंद्र ग्रहण दिसणार आहे. म्हणूनच भारतात चंद्र ग्रहणचा धार्मिक प्रभाव व सूतक मान्य केले जाणार आहे. व सूतक काळात ग्राहणाचे नियम पाळावेत.
(Disclaimer: दिलेली माहिती फक्त आपल्याला माहितीसाठी देत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही. )