रात्री झोपण्याच्या वेळी स्कीनवर लावा तूप 8 समस्यापासून मिळवा मुक्ती
आपल्या स्कीनवर म्हणजेच त्वचेवर तूप लावल्याने बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. खर म्हणजे तुपाचा वापर नाइट क्रीम म्हणून केल्यास बरेच फायदे होऊ शकतात.
The text Ghee Benefits For Healthy Skin Tupache Fayde Twachesathi in Marathi be seen on our You tube Chanel Ghee Benefits For Healthy Skin Tupache Fayde Twachesathi
तुपाचे काय काय फायदे आहेत ते आपल्याला सर्वाना माहीत आहेच. आपल्याला माहिती आहे का तुपाचा वापर जर स्कीनसाठी केला तर तर चेहऱ्याच्या समस्या बऱ्याच दूर होऊ शकतात. तुपामध्ये पाणी, ऊर्जा, विटामीन A, कॅलरी,चे तत्व असतात.
आज आपण तुपाचा वापर आपल्या स्कीनवर कश्या प्रकारे करू शकतो व त्याचे फायदे काय आहेत ते पाहू या.
1. स्कीन जर भाजली असेलतर तर ती कशी भरून काढायची:
स्कीन जर भाजली गेली असेलतर त्यावर तूप लावणे फायदेमंद आहे. कधी कधी सूर्याची तेज किरणे सुद्धा आपल्या स्कीनला नुकसान पोहचवू शकतात. त्यामुळे आपली स्कीन काळी व डाग पडल्या सारखी दिसते. अश्या वेळेस जर चेहऱ्यावर रात्री झोपण्याच्या अगोदर तूप लावले तर स्कीन वरील डाग दूर होऊ शकतात. किंवा दिवसा लावायचे असेलतर तूप लावून एक तास तसेच ठेऊन मग कोमट पाण्यानी चेहरा स्वच्छ करावा.
2. सूज येण्यापासून मज्जाव:
शरीरावर कोणत्यासुद्धा भागावर सूज आलीतर त्या भागावर तूप लावल्यास फायदा होऊ शकतो. कारणकी तुपामध्ये आयुर्वेदिक गुण भरपूर प्रमाणात असतात. अश्या वेळी रात्री झोपताना तूप लावून मग झोपावे मग सकाळी उठल्यावर मऊ सूती कापडानी तूप लावलेली जागा साफ करून मग कोमट पाण्यानी धुवावे. किंवा दिवसा लावायचे असेलतर एक तास लावून मग कोमट पाण्यानी धुवावे.
3. ओठ फाटले असतीलतर:
ओठ जेव्हा रुष्ट किंवा बेजान होतात तेव्हा ते फाटतात. थंडीच्या सीझनमध्ये ही समस्या जास्त करून होते. तेव्हा ओठाला रोज तूप लावल्याने ह्या समस्या पासून छुटकारा मिळू शकतो. रात्री झोपताना ओठांवर तूप लाऊन झोपावे सकाळी उठल्यावर ओठ मऊ दिसून येतील. हा प्रयोग आपण दिवसा सुद्धा करू शकतो.
4. त्वचा रोग नाहीसे होतात:
स्कीन वरील रोग दूर करण्यासाठी तूप फायदेशिर आहे. तुपामध्ये असे गुण आहेत की ते खाज, रुक्षपणा, पुरळ संबंधित समस्या दूर करते.
5. स्कीन वरील कोरडेपणा कमी करते:
थंडीच्या सीझनमध्ये आपली स्कीन कोरडी व रुक्ष अशी होते. अश्या वेळी तुपाचा वापर होऊ शकतो फायदेमंद. रात्री झोपण्याच्या वेळी कापसाच्या सहयानी आपल्या चेहऱ्यावर तूप लावावे. मग सकाळी कोमट पाण्यानी धुवावे. पण जर आपली स्कीन ऑयली आहे तर तुपाचा वापर करण्याच्या अगोदर एकदा एक्सपर्टचा सल्ला घेणे जरुरीचे आहे.
6. उजळ त्वचेसाठी:
रात्री झोपण्याच्या अगोदर स्कीनवर तूप लावल्याने स्कीनच रंग बदलू शकतो. ज्यांचा रंग काळसर आहे त्यांनी हा उपाय जरूर करून पहावा. पण हा उपाय थोडे दिवस नियमित करा.
7. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करते:
चेहऱ्यावरील काळे डाग व स्कीन वरील काळे डाग दूर करण्यासाठी तूप फायदेमंद आहे. आज काल लोक काळे डाग किंवा डार्क स्पोट्सनी बरेच परेशान आहेत. अश्या वेळी जर रात्री झोपताना स्कीनवर नाइट क्रीम म्हणजेच तूप लावले तर स्कीन डाग विरहित होऊ शकते पण हा प्रयोग रोज करायचा आहे.
8. डोळ्याची जळजळ किंवा थकान दूर होते:
डोळ्याचा थकवा दूर करण्यासाठी तुपाचा वापर कामी येतो. रात्री झोपताना डोळ्याच्या आजूबाजूला तूप लावून हलके मालीश करा. मालीश करताना बोटांनी गोलाकार डायरेशननी मालीश करा. त्यामुळे डोळ्याच्या खाली जर काळी वर्तुळ झाली असतील तर ती सुद्धा निघून जातील. पण तूप लावताना काळजी घ्या ते आपल्या डोळ्यात जाता कामा नये.
टीप: तूप आपल्या स्कीनसाठी फायदेशीर आहे. पण तुपाचा वापर करताना जर आपल्या स्कीनवर जळजळ होत असेल तर एक्सपर्टचा सल्ला घ्या किंवा जर आपली स्कीन ऑईली आहे तरी तुपाचा वापर करताना एक्सपर्ट चा सल्ला जरूर घ्या.