कार्तिक पूर्णिमा 2022 उपाय करा चमकेल भाग्य माता लक्ष्मी होईल प्रसन्न
कार्तिक पूर्णिमा 2022 ह्या वर्षी 8 नोव्हेंबर मंगळवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी पवित्र नदीवर स्नान केल्याने किंवा स्नान करताना पाण्यात ही वस्तु टाकल्याने सर्व बाधा कष्ट नाहीसे होतील.
The text Kartik Purnima 2022 Lakshmi Prapti Upayin Marathi be seen on our You tube Chanel Kartik Purnima 2022 Lakshmi Prapti Upay
कार्तिक हा संपूर्ण महिना भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. कार्तिक पूर्णिमा हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे किंवा स्नान करण्याच्या पाण्यामध्ये ही वस्तु टाकून स्नान केल्याने सर्व बाधा, कष्ट नाहीसे होतील असे म्हणतात. त्याच बरोबर भगवान श्री हरी ह्यांचा जप, तप ध्यान, दान, पूजन केल्याने जीवनभराचे पाप कर्म नष्ट होतात व अक्षय पुण्यची प्राप्ती होते. जर आपल्याला पवित्र नदी किंवा कुंडामध्ये स्नान करणे शक्य नसेलतर घरीच स्नान करताना काही विशेष वस्तु पाण्यात टाकून स्नान केल्यास तमाम दोष दूर होतील व त्याच बरोबर आर्थिक लाभ मिळतील. त्याच बरोबर कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी अजून काही उपाय केले तर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहून आपले भाग्य चमकू शकेल.
हिंदू धर्म शास्त्रामध्ये प्रतेक पूर्णिमाचे विशेष महत्व आहे. पण कार्तिक पूर्णिमा ह्या दिवसाचे विशेष महत्व आहे. कार्तिक महिना हा सर्व महिन्यात सर्वोत्तम फलदायी महिना मानला जातो.
पौराणिक मान्यता अनुसार ह्या महिन्यात म्हणजेच कार्तिक महिन्यात श्री हरी विष्णु ह्यांनी मत्स्य अवतार धारण केला होता. सिख धर्म मध्ये कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी गुरु नानक जयंती ह्या रूपात साजरा केला जातो. शास्त्रा अनुसार कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी काही विशेष काम किंवा कार्य केले तर माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्या जीवनात धन-धान्यची कमतरता होत नाही. त्याच बरोबर जीवनात आर्थिक नुकसान होत नाही.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी घरी स्नान करताना ही वस्तु पाण्यात टाकून स्नान करा व काही सोपे सटीक उपाय केले तर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळू शकेल.
इलायची-केशर:
आपले काम जर बरेच दिवसा पासून अडकले असेलतर किंवा शुभ काम करताना काही बाधा येत असेलतर कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी पवित्र नदी च्या पाण्यात 2 इलायची म्हणजेच वेलदोडा व थोडेसे केशर घालून स्नान करावे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळेल व वाईट वेळ निघून जाईल. त्याच श्री हरीच्या कृपेने कार्य पूर्ण होण्यास वरदान मिळू शकेल. केशर घालून स्नान केल्याने शुभता प्राप्त होते.
दूध:
शास्त्रा नुसार कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात दूध मिक्स केल्याने शरीराची दुर्बलता दूर होऊन आत्मविश्वास वाढतो व काम करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच स्नान केल्यावर श्री हरीचे ध्यान करून विष्णु सहस्त्रनाम म्हणावे.
हळद:
भगवान विष्णु ह्यांना हळद प्रिय आहे. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात एक चिमूट हळद घालून स्नान केल्यास विवाह संबंधित समस्याचे निवारण होईल. त्याच बरोबर ब्रह्मस्पति देवाची कृपा मिळेल. हळदीचे स्नान करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे.
काळे तीळ:
पैशांची तंगी व धन येऊन सुद्धा टिकत नाही व सर्व खर्च होऊन जातात. तर कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालून स्नान करा त्यामुळे आपले भाग्य प्रबळ होऊ होऊन दारिद्रता निघून जाते.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी शक्य असेलतर गंगा-यमुना नदीमध्ये स्नान केल्यास सौभाग्यची प्राप्ति होते. हातात कुशा घेऊन स्नान करून दान करावे. त्यामुळे रोगमुक्ती होते असे म्हणतात.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर हळद व पाणी मिक्स करून त्याने स्वस्तिक काढून आंब्याच्या पानाचे तोरण लावले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी गंगाघाट किंवा कोणत्या पवित्र नदीवर जाऊन दिवा लावल्याने व दिवा दान केल्याने देवतांचा आशीर्वाद मिळतो. त्याच बरोबर घरात सुख समृद्धी येते.
कर्तीक पूर्णिमा ह्या दिवशी तुळशी जवळ दिवा लाऊन तिच्या मुळाची माती तिलक म्हणून लावल्यास प्रेतक काम किंवा कार्यमध्ये सफलता मिळते.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी भगवान शंकर ह्यांची विशेष पूजा करतात ह्या दिवशी दूध, दही, तूप मध व गंगाजल मिश्रित पंचामृत अर्पित करून बेल पत्र अर्पित करायला विसरू नका. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात व आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करतात
(Disclaimer: दिलेली माहिती फक्त आपल्याला माहितीसाठी देत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही. )