15 किचन बेस्ट टिप्स आता तुम्ही म्हणाल अगोदरच का नाही सांगितल्या
स्वयंपाक करणे ही एक कला आहे पण स्वयंपाक करताना किचनमध्ये नेहमी जागरूक राहिले पाहिजे. कारणकी कोणती सुद्धा डिश बनवताना दुर्लक्ष झाले की आपली डिश चांगली बनत नाही. मग मीठ कमी जास्त होते, किंवा तिखट होते किंवा कमी तिखट होते. तर कधी तेलच जास्त होते. त्यामुळे नुकसान होते. कधी कधी काय होते आपल्याला छोट्या छोट्या टिप्स माहीत नसतात त्यामुळे जेवण सुद्धा बिघडते.
The text 15 Important Kitchen Tips And Tricks in Marathi be seen on our You tube Chanel 15 Important Kitchen Tips And Tricks
आता आपण काही महत्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
15 बेस्ट किचन टिप्स (15 best kitchen tips)
* गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केलातर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही.
* जर दुधाच्या मलईमध्ये 1 चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते.
* गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्यूसी बनवायचे असतीलतर मावा (खवा) मध्ये थोडे पनीर किंवा छेना मिक्स करून गुलाबजाम बनवा खूप छान होतात.
* रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध 1 ते 2 टे स्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतात.
* जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दहयाचे भांडे ठेवा मग 1 तासानि पहा दही चांगले जमलेले असेल. पण भांडे हलवता कामा नये ते एकदम स्थिर राहिले पाहिजे.
* आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून बरणी उन्हात ठेवा. मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा. जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरुन लोणचे थोडे काढून घ्या. म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावे लागणार नाही.
* आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गूळ घातल्यास लोणच्याची टेस्ट मस्त लागते.
* शहाळे फोडायचे असेलतर सर्वात पहिल्यांदा वरतून भोक पाडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या मग शहाळे वस्तवावर गरम करायला ठेवा. वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल.
* केळ्याचा घड दोरीला लटकावून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत 5-6 दिवस चांगली राहतात.
* दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमद्धे ठेवा त्यामुळे साय छान भाकरी सारखी जाड येते.
* फ्रीजमध्ये खूप वास येत असेलतर एका बाउल मध्ये लकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल.
* हिरवी मिरचीची देठ काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते.
* आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये एक चिमुट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो.
* आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो पण ते फेकून न देता कणिक मळताना वापरा ते खूप पौष्टिक असते.
* दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दहीवडे मस्त अगदी नरम बनतात.