मार्गशीष गुरुवार व्रत उद्यापन 2022 कधी करायचे पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे
पाचव्या शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे
उद्यापन करावे का?
उपवास करायचा का?
पाचवा गुरुवार करायचा का?
मार्गाशीष महिना गुरुवार व्रत आरंभ 24 नोव्हेंबर 2022 सुरू झाला आहे व समाप्ती 22 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे.
The text Margashirsha Guruvar Vrat Udyapan 2022 in Marathi be seen on our You tube Chanel Margashirsha Guruvar Vrat Udyapan 2022
मार्गशीष शेवटचा गुरुवार 22 डिसेंबर 2022 ह्या दिवशी आहे. ह्या वर्षी मार्गाशीष महिन्यात 5 गुरुवार आले आहेत. पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे. अमावस्या ह्या दिवशी आपण गुरुवार च्या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करू शकतो. आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करतो. अमावस्या हा दिवस पूजा अर्चा करण्यासाठी चांगला मानला जातो.
मार्गाशीष महिन्यातील आमवस्या गुरुवार 22 डिसेंबर 2022 रोजी आहे.
अमावस्या आरंभ गुरुवार संध्याकाळी 7 वाजून 14 मिनिट
आमवस्या समाप्ती शुक्रवार दुपारी 3 वाजून 27 मिनिट
गुरुवार ह्या दिवशी महालक्ष्मी व्रत उद्यापन केले तरी चालेल. अमावस्या असलीतरी ह्या दिवशी महालक्ष्मी पूजा, अर्चा, आरती, मंत्र जाप व कहाणी सुद्धा आइकावी. आपण चार गुरुवार जसे व्रतनियम पाळतो तसेच पाचव्या गुरुवारी सुद्धा व्रत नियम पाळावयाचे आहेत.
पूजा आरती, कहाणी झाल्यावर गोड पदार्थाचा नेवेद्य दाखवावा. पाच गुरुवार पैकी एक गुरुवारी पुरणपोळीचा नेवेद्य दाखवावा. गाईला घास द्यावा. विवाहित महिलेला बोलवून तिची खणा नारळा ने ओटी भरावी. तिला जेऊ द्यावे. मग आपण जेवावे. संपूर्ण दिवस मन प्रसन्न ठेवावे. लक्ष्मी देवीचे नामस्मरण करावे. संध्याकाळी 7 सुवासिनिना हळद-कुकु देवून ओटी भरून फळ, भेट वस्तु द्यावी किंवा कुमारिकांना बोलावले तरी चालते. असे करून व्रताची सांगता करावी.
शुक्रवारी सकाळी आंघोळ करून कलशातील पाणी घरात शिंपडून बाकीचे पाणी तुळशील घालावे कलशातील नारळ, फुले व पत्री नदीमध्ये विसर्जित करावी.
मार्गाशीष महिन्यातील व्रत आपण घरात सुख शांती राहून आपल्या घरातील लोकांचे सगळे मंगल होऊ दे म्हणून आपण करतो. लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहू दे व कुटुंबाचे कल्याण होऊ दे आपल्याला ध्यान संपत्ति, एशवर्य प्रगती व समाधान मिळूदे म्हणून आपण हे व्रत करतो.