31 डिसेंबर स्पेशल रेस्टोरेंट स्टाईल पारंपारिक शाही नॉनवेज बिर्याणी मसाला पाउडर रेसीपी
आता 31 डिसेंबर येत आहे मग त्यादिवशी मस्त पैकी चिकन बिर्याणी बनवू या. बिर्याणी म्हंटले की आपल्याला हॉटेल मधील छान खमंग टेस्टी लज्जतदार बिर्याणी डोळ्या समोर येते. बिर्याणीची टेस्ट त्याच्या मसाला वरून येते. जर मसाला छान खमंग झाला तर बिर्याणी एकदम रेस्टोरेंट स्टाईल बनते. बिर्याणी मसाला नेहमी ताजा बनवून वापरला तर बिर्याणीला वेगळीच चव येते. आपल्याला घरच्या घरी ताजी शाही नॉनवेज बिरयानी बिर्याणी मसाला पाउडर बनवता येते. बिर्याणी हा असा पदार्थ आहे कितो सर्वाना म्हणजेच लहान किंवा मोठे असो सर्वाना आवडतो. बिर्याणी बरोबर दुसरे काही नाही बनवले तरी चालते.
The text 31st December Special Restaurant Style Shahi Biryani Masala in Marathi be seen on our You tube Chanel 31st December Special Restaurant Style Shahi Biryani Masala
आपण घरी कधी सुद्धा अश्या प्रकारचा नॉनवेज बिर्याणी मसाला वापरुन पार्टीला किवा कधी सुद्धा बिर्याणी बनवू शकतो. शक्यतो मसाला ताजा बनवून वापरला तर त्याची खुशबू मस्त येते. आपण घरच्या घरी मस्त बिर्याणी मसाला बनवू शकतो अगदी सोपी पद्धत आहे व झटपट होणारा आहे.
बिर्याणी मसाला पाउडर बनवतांना लवंग, दालचीनी, काळी मीरी, शहाजिरे, जायपत्री, हिरवे वेलदोडे वापरले आहेत. अश्या प्रकारचा बिर्याणी मसाला आपण अंड्याची बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, पनीर बिर्याणी, नॉन वेज किवा व्हेज बिर्याणी साठी वापरू शकतो.
पारंपारिक शाही नॉनवेज बिर्याणी मसाला पाउडर रेसिपी आपण आमच्या साईटवर येथे पाहू शकता:
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनीट
वाढणी: 100 ग्राम
साहित्य:
20 ग्राम लवंग
4-5 तुकडे दालचीनी
20 ग्राम काळी मीरी
10 ग्राम शहाजिरे
10 ग्राम जायपत्री
8-10 हिरवे वेलदोडे (सोलून)
कृती:
तवा किंवा कढई गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये लवंग, दालचीनी, मीरी, शहाजिरे, जायपत्री, हिरवे वेलदोडे कोरडेच गरम करून घ्या. खूप भाजायचे नाही फक्त गरम होई परंत भाजायचे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे.
बिर्याणी मसाला जेव्हडा पाहीजे तेव्हडा काढून घ्या मग बाकीचा घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.