केक डोरेमॉन केक बिना अंडे पॅनमध्ये बनवा मुलांसाठी
डोरेमॉन लहान मुलांची टीव्ही सिरियल म्हणजेच मालिका खूप लोकप्रिय आहे. मुले ही सिरियल अगदी आवडीने पाहतात. त्यामध्ये डोरेमॉन नेहमी डोरा केक खाताना दिसतो. ते पाहून मुले सुद्धा हट्ट करतात आम्हाला सुद्धा डोरा केक पाहिजे पण डोरा केक बाजारात विकत मिळतो का ते माहीत नाही.
The Dora Cake Dora Pancakes Eggless For Kids can be seen on our YouTube Channel Dora Cake Dora Pancakes
केक म्हंटले की मुलांचा आवडता पण मोठ्यांनासुद्धा आवडतो. आत्ता पर्यन्त आपण बऱ्याच केकच्या रेसीपी पाहिल्या. आता आपण आज मुलांसाठी खास त्यांचा आवडता केक डोरा केक बनवणार आहोत.
डोरा केक पाहून मुले नक्की आनंदी होतील. डोरा केक बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. मुलांना भूक लागली तर आपण झटपट बनवू शकतो. डोरा केक पौस्टिक सुद्धा आहे कारण की ह्यामध्ये गव्हाचे पीठ व दूध वापरले आहे. तसेच वरतून चॉकलेट सॉस घातला तर मुळे अगदी खुश होतील.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 8 मध्यम आकाराचे बनतात
साहित्य:
1 कप गव्हाचे पीठ
½ कप पिठीसाखर
4 टे स्पून मिल्क पाऊडर
¼ टी स्पून बेकिंग सोडा
1 टे स्पून मध
½ टी स्पून व्हनीला एसेन्स
1 कप दूध
2 टे स्पून तेल अथवा बटर
चॉकलेट सॉस
कृती: एका बाऊलमद्धे गव्हाचे पीठ, पिठीसाखर, मिल्क पाऊडर, बेकिंग सोडा घालून मिक्स करा. मग त्यामध्ये मध व एसेन्स घालून मिक्स करून दूध घालून मिश्रण बनवून घ्या. मिश्रण असे पहिजे की डावानी खाली टाकले असता रिबिन सारखे पडले पाहिजे.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल लाऊन एक डाव मिश्रण घेऊन तेल लावलेल्या भागावर वरतून सोडावे मग ते मिश्रण आपोआप थोडेसे पसरत जाईल डावानी त्याला आजिबात पसरवायचे नाही. मग बाजूनी थोडेसे तेल सोडून पॅन वर झाकण ठेवून मंद विस्तवावर 30-40 सेकंद फक्त बेक करावे व लगेच उलट करून परत 20 सेकंद बेक करून लगेच तव्यावरून काढावे. अश्या प्रकारे सर्व डोरा केक बनवावे.
सर्व डोरा केक बनवून झालेकी एक केक घेऊन त्यावर चॉकलेट सॉस घालून वरतून दूसरा केक ठेवावा मग सर्व्ह करावे. किंवा पाहिजे असल्यास वरतून चोकॉलेट सॉस लाऊन सर्व्ह करावे.