हळदीचे उपाय टोटके बदलेल आपली किस्मत प्रतेक कामात मिळेल सफलता
हळद आपण स्वयंपाक करताना वापरतो त्याच बरोबर हळदीचा उपयोग पूजा पाठ करण्यासाठी केला जातो. ज्योतिष शास्त्रमध्ये हळदीचा उपयोग टोटके किंवा उपाय भाग्य उघडण्यासाठी केला जातो.
The text Haldi Che Totke Upay Turmeric Remedies For Success in Marathi be seen on our You tube Chanel Haldi Che Totke Upay Turmeric Remedies For Success
हिंदू धर्मा मध्ये हळदीला खूप पवित्र मानले जाते. त्यामुळेच कोणते सुद्धा कार्य हळदीच्या विना पुरे होत नाही. हळद फक्त मसाल्यापुरती सीमित नसून त्याचा उपयोग औषधे बनवण्यासाठी सुद्धा करतात. त्याच बरोबर ज्योतिष शास्त्रमध्ये सुद्धा हळदीचा उपयोग केला जातो.
हळद भगवान विष्णु ह्यांना अतिप्रिय आहे. म्हणूनच गुरुवार ह्या दिवशी केलेले हळदीचे टोटके खूप प्रभावी मानले जातात. हळदीचे टोटके फक्त भाग्य उघडण्यासाठी नाहीतर नजरदोष काढण्यासाठी सुद्धा केला जातो. कुंडलीमधील गुरु ह्या ग्रहाची स्थिति मजबूत करण्यासाठी उपयोग केला जातो.
आता आपण पाहू या हळदीचे टोटके किंवा उपाय काय आहेत.
आपण खूप प्रयत्न करतो पण आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ मिळत नाही. तर बुधवार ह्या दिवशी गणेश भगवान ह्यांना हळदीच्या गाठीची माळ अर्पित करा. असे केल्याने आपल्या कार्यात येणारी बाधा दूर होईल.
एक हळकुंड घेऊन ते लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेऊन त्याची रोज नियमित पूजा करा. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल.
आपले धन म्हणजेच पैसे कोणाकडे तरी अडकले आहेत किंवा कोणत्या कामात अडकले आहेत तर थोडे तांदूळ घेऊन त्याला हळद लाऊन पिवळ्या रंगाचे बनवा मग लाल रंगाच्या कापडात बांधून पर्समध्ये ठेवा. असे केल्याने अडकलेले पैसे लवकर परत मिळतील.
आपण कोणत्यासुद्धा शुभ कार्यासाठी जात असाल तर जाताना गणेश भगवान ह्यांना हळदीचा टीका लावावा मग बाहेर पडावे. असे केल्याने शुभ फळ प्राप्त होते. व कार्य सफल होण्यास मदत होते.
आपण जर वाईट स्वप्न मुळे परेशान असाल तर एक हळकुंड घेऊन त्याला लाल धागा बांधून रात्री झोपताना उशाशी घेऊन झोपा असे केल्याने वाईट स्वप्न येणार नाहीत.
देवगुरू बृहस्पति व विष्णु भगवान ह्यांना प्रसन्न करण्यासाठी गुरुवार ह्या दिवशी चणे, डाळ व हळद दान करा. भगवान विष्णु व माता लक्ष्मीच्या फोटो समोर रोज एक चिमूट हळद अर्पित केल्याने माना सारखा जोडीदार मिळतो. त्याच बरोबर विवाहमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतात.