मार्गशीर्ष अमावस्या चुकून सुद्धा करू नका ही 5 कामे परिणाम चांगले नाही होणार
मार्गशीर्ष अमावस्या 22 डिसेंबर 2022 गुरुवार शुक्ल पक्ष ह्या तिथीला आहे. ह्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण व पिंडदान करण्याची परांपरा आहे. असे म्हणतात की भूत-प्रेत, पितृ, पिशाच व निशाचर सारख्या नकारात्मक शक्ति सक्रिय होतात म्हणूनच अमावस्याच्या दिवशी 5 काम चुकून सुद्धा करू नका.
The text Margashirsha Amavasya 2022 Chukun Sudha Karunye 5 Kame in Marathi be seen on our You tube Chanel Margashirsha Amavasya 2022
मार्गशीर्ष अमावस्या 22 डिसेंबर 2022 गुरुवार
अमावस्या आरंभ गुरुवार संध्याकाळी 7 वाजून 14 मिनिट व
मार्गशीर्ष अमावस्या समाप्ती शुक्रवार दुपारी 3 वाजून 27 मिनिट
अमावस्याच्या दिवशी 5 काम चुकून सुद्धा करू नका.
1. स्मशाना पासून दूर रहा:
अमावस्याच्या दिवशी स्मशानाच्या जवळ किंवा त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू नये. तसेच अमावस्याच्या दिवशी सुनसान रस्त्यावर सुद्धा जाऊ नये. असे म्हणतात की जे कमकुवत न]मनाचे असतात त्याच्या वर नकारात्मक शक्तिचा लगेच प्रभाव होतो. त्यामुळे अश्या लोकांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे.
2. उशिरा पर्यन्त झोपू नये:
अमावस्याच्या दिवशी उशिरा पर्यन्त झोपू नये. अशाने पितरांचा आशीर्वाद मिळत नाही. ह्या दिवशी सूर्योदयच्या वेळी उठावे व सूर्य देवाला जल अर्पण करावे.
3. भांडण-तंटे:
अमावस्याच्या दिवशी घरात भांडण-तंटे करू नये . असे म्हणतात की अमावस्या च्या दिवशी जय घरात भांडण तंटे होतात त्या घरात पितरांची कृपा रहात नाही.
त्यामुळे घरात शांती ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच ह्या दिवशी चिडचिड करू नका व कोणाचा अपमान करू नका.
4) मसालेदार जेवण करू नका:
मार्गशीष अमावस्याच्या दिवशी मसालेदार जेवण करू नका. ह्या दिवशी आल-लसूण-कांदा सेवन करू नका. मांस, मासे, दारू पासून दूर रहा.
5) शारीरिक संबंध:
अमावस्याच्या दिवशी पती-पत्नी नि शारीरिक संबंध ठेऊ नये. असे म्हणतात चौदस, अमावस्या व प्रतिपदा अश्या तिथीला तन, मन पवित्र ठेवावे.
अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे फलदाई असते. ह्या दिवशी पितरांना तर्पण, भोजन अर्पित करावे त्यामुळे सुख समृद्धी मिळते व गोरगरिबांना भोजन द्यावे त्यामुळे धन संपत्ति मिळते.
सूर्योदयच्या पूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्यामुळे चांगले फळ मिळते संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला दूध अ पाणी अर्पित करून 11 प्रदक्षिणा घालाव्या त्यामुळे सुख मिळते.
टीप: आम्ही ही माहिती फक्त आपल्या पर्यन्त पोचवत आहोत त्याची कोणतिसुद्धा हमी आम्ही घेत नाही.