‘साईबाबांची ११ वचनं’ भक्तांच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता, संकट, कष्ट दूर करतील व सुख समाधान देईल
साईबाबा असे देवता आहेत की त्यांना कोणी सुद्धा कोणत्याही इतर धर्मामध्ये जातीच्या बंधनात बांधू शकत नाही. हिंदू असो वा मुस्लिम असो किंवा इतर कोणत्यासुद्धा धर्माचा असो साईच्या दरबारात सर्व भक्त सारखे आहेत. जर तुमची साई बाबांवर मनापासून भक्ति व श्रद्धा असेलतर तर साईबाबा तुमच्या जीवनाची नौका अगदी सहज पार करतील.
The text Sai Baba 11 Vachan With Meaning in Marathi be seen on our You tube Chanel Sai Baba 11 Vachan With Meaning
साईबाबा ही खूप कृपाळू आहेत टे प्रतेक भक्तांचे दुख, पीडा, कष्ट, जाणतात जर आपण त्याना अंतर मनातून हाक दिली तर ते भक्ताच्या संकटात धाऊन येतात व त्याचे निराकरण करतात.
आपण कोणते सुद्धा काम सुरू करण्याच्या अगोदर साई बाबांची ११ वचन मनापासून स्मरण करा तुमची आडलेली कामे लगेच पार होतील.
साई बाबांची 11 वचन व त्याचा अर्थ असा आहे:
१] शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे।
साईबाबा म्हणतात की जे भक्त साईबाबांच्या नगरीत शिर्डीला दर्शनाला येईल, त्याच्या सर्व चिंता, दुख व कष्ट दूर होतील. जर कोणी भक्त काही कारणांमुळे शिर्डीला दर्शनासाठी येण्यास असमर्थ असेल तर त्यांनी आपल्या जवळ पासच्या साई मंदिरात जाऊन भक्तिनि नमस्कार करावा.
२] माझ्या समाधीची पायरी चढेल । दुःख हे हरेल सर्व त्याचे।
शिडीच्या साईबाबांच्या समाधीच्या पायऱ्यावर पाय ठेवताच व डोके टेकवताच भक्तांची सर्व दुःख कष्ट नष्ट हो तील.
३] जरी हे शरीर गेलो भी टाकून । तरी भी धावेन भक्तासाठी।
साईबाबा जरी आपल्या वर्तमानकाळात शरीर रूपाने उपस्थित नसले तरी भक्तांनी हाक मारतच ते भक्तांच्या सकटांचे निवारण करण्यास मदत करतात.
४] नवसास माझी पावेल समाधी । धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी।
साईबाबांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा ते सर्वत्र आहेत. साईबाबांच्या समाधीवर डोके टेकवल्यास व प्रार्थना केल्यास ती पूर्ण होईल.
५] नित्य भी जिवंत जाणा हेंची सत्य । नित्य ध्या प्रचीत अनुभवे।
साई असे म्हणतात की शरीर जरी शरीर नश्वर असल तरी आत्मा अजर-अमर असते. साई नेहमी जीवंत असतात. ते आपण भक्ति व श्रद्धा ठेवून अनुभवू शकाल.
६] शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी।
साईबाबा म्हणतात की जो भक्त पूर्ण श्रद्धेने त्याना शरण जाईल त्याच्या सर्व इच्छा व मनोकामना नक्की पूर्ण होतील.
७] जो जो मज भजे जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे मीही त्यासी।
साई म्हणतात की ज्या भक्ताच्या मनात जश्या भावना असतील त्याला माझे तसे रूप दिसेल. भक्त जशी ज्या भावनाने माझी आराधना करील त्या भावनेने त्याची मनोकामना पूर्ण होईल.
८] तुमचा भी भार वाहीन सर्वथा । नव्हे हें अन्यथा वचन माझे।
साईनच्या म्हणयानुसार जो भक्त त्यांना शरण जावून त्यांच्या भक्तिमध्ये विलीन होईल त्यांना साई चिंता मुक्त करील.
९]जाणा येथे आहे सहाय्य सर्वास । मागे जे जे त्यास ते ते लाभे।
साई असे म्हणतात की जो साईभक्त श्रद्धा पूर्वक त्यांची सहायता मागेल त्याना साई नक्की मदत करेल. तसेच कधी सुद्धा निराश करणार नाही.
१०] माजा जो जाहला काया वाचा मनी । त्याचा मी ऋणी सर्वकाल।
साई राम असे म्हणतात की जो साई भक्त तनानी, मनानी साई भक्तिमध्ये लीन होईल साई नेहमी त्यांचा ऋणी राहील. भक्ताच्या संपूर्ण जीवनाची हमी म्हणजेच जबाबदारी साई आपल्यावर घेतील.
११] साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी।
साईबाबा म्हणतात की, जो भक्त धन्य आहे व जो साई सांगतील त्या गोष्टीचे पालन करतो व कोणत्यासुद्धा संकटाला न घबरता साईवर विश्वास ठेऊन त्यांच्या कडे विनवणी करतो साई त्याच्यावर अपार प्रेम करतो.