मऊ टेस्टि खमंग तांदूळ चनाडाळ ढोकळा मुलांच्या डब्यासाठी
ढोकळा म्हंटले की गुजराती लोकांची लोकप्रिय डिश आहे. ढोकळा ही ही अशी डिश आहे की आपण नाश्तासाठी किंवा जेवताना साईड डिश म्हणून किंवा स्टार्टर म्हणून किंवा कोणी पाहुणे आले की बनवू शकतो किंवा मुलांच्या पार्टीसाठी किंवा शाळेत जाताना डब्यात सुद्धा देता येतो. ढोकळा सर्वाना आवडतो.
आपण ढोकळा वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आज आपण तांदूळ, चनाडाळ व उडीदडाळ वापरुन बनवणार आहोत. तांदूळ व चनाडाळ वापरुन बनवलेला ढोकळा मस्त लागतो. तसेच बनवायला अगदी सोपा आहे. चनाडाळ व तांदूळ आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 8 जणसाठी
साहित्य:
3 वाट्या तांदूळ
1 वाटी चनाडाळ
1/2 वाटी उदीडदाळ
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1/4 टी स्पून हळ
मीठ चवीने
1/4 टी स्पून इनो
1 टी स्पून तेल
फोडणीचे साहित्य:
1 टे स्पून तेल1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
10-15 कडीपत्ता पाने
2 टे स्पून कोथिंबीर व ओला नारळ सजावटी करिता
कृती:
प्रथम तांदूळ, चनाडाळ, उडीदाळ धुवून 5 तास भिजत ठेवा. मग मिक्सर मध्ये बारीक वाटून 7-8 तास झाकून बाजूला ठेवा. मग त्यामध्ये आल-लसूण-मिरची पेस्ट, हळद, मीठ चवीने घालून मिक्स करा. मग त्यामध्ये इनो घालून त्यावर तेल घालून मिक्स करून घ्या. मिश्रण हळुवार पणे हलवून घ्या. महणजे मिश्रण छान फुलून येईल.
ज्या भांड्यात किंवा डब्यात ढोकळा बनवायचा आहे त्याला तेल लाऊन घ्या. कुकरची शिट्टी काढून ठेवा कुकरमद्धे पाणी घालून गरम करून घ्या. मग तेल लावलेल्या डब्यात मिश्रण ओतून घ्या,
मग डब्बा कुकरमद्धे ठेऊन त्यावर झाकण ठेवा मग कुकरचे झाकण लाऊन घ्या. आता ढोकळा 20 मिनिट वाफवून घ्या. 20 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करून कुकरचे झाकण काढून डब्बा बाहेर काढून थंड करायला ठेवा.
फोडणी करिता: कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता घालून मग विस्तव बंद करून फोडणी कोमट झाल्यावर ढोकळ्यावर एक सारखी पसरवून घाला. आता एकसारखे पिसेस कापून घ्या.
कोथिंबीर व ओला नारळ घालून सजवून चटणी बरोबर सर्व्ह करा.