26 जानेवारी २०२३ बसंत पंचमी चार शुभ योग मुहूर्त व माता सरस्वती पूजाविधी
बसंत पंचमी हा दिवस विद्याची देवी माता सरस्वतीला समर्पित आहे. ह्या दिवशी माता सरस्वतीची विधी पूर्वक पूजा अर्चा केल्यास व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होतो.
The text 26 January 2023 Basant Panchami Puja Muhurat, Puja Vidhi Mata Saraswati in Marathi be seen on our You tube Chanel 26 January 2023 Basant Panchami
बसंत पंचमी ह्या वर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्ष २६ जानेवारी २०२३ गुरुवार ह्या दिवशी आहे. ज्योतिष शास्त्रा नुसार बसंत पंचमी ह्या दिवशी ४ खूप चांगले शुभ योग आहेत.
बसंत पंचमी शुभ योग:
१) शिव योग:
ह्या वर्षी बसंत पंचमीचा शुभारंभ शिव योग वर होणार आहे. खर म्हणजे २५ जानेवारी संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिट पासून ते २६ जानेवारी दुपारी ३ वाजून २९ मिनिट पर्यन्त शिव योग आहे.
२) सिद्ध योग:
बसंत पंचमी ह्या दिवशी शिव योग समाप्त झाल्यावर लगेच सिद्ध योग सुरू होत आहे. सिद्ध योग २६ जानेवारी दुपारी ३ वाजून २९ मिनिट पासून २७ जानेवारी दुपारी १ वाजून २२ मिनिट पर्यन्त आहे.
३) सर्वार्थ सिद्धी योग:
बसंत पंचमी ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग संध्याकाळी ६ वाजून ५७ मिनिट पासून २७ जानेवारी सकाळी ७ वाजून १२ मिनिट पर्यन्त आहे.
४) रवि योग:
बसंत पंचमी ह्या दिवशी रवि योग येत आहे. २६ जानेवारी संध्याकाळी ६ वाजून ५७ मिनिट पासून २७ जानेवारी सकाळी ७ वाजून १२ मिनिट पर्यन्त आहे.
बसंत पंचमी पूजा मुहूर्त:
हिंदू पंचांग नुसार माघ शुक्ल पंचमी २५ जानेवारी दुपारी १२ वाजून ३४ मिनिट पासून २६ जानेवारी सकाळी १० वाजून २८ मिनिट पर्यन्त आहे. पण बसंत पंचमी २६ जानेवारी गुरुवार ह्या दिवशी सकाळी ७ वाजून १२ मिनिट पासून दुपारी १२ वाजून ३४ मिनिट पर्यन्त शुभ मुहूर्त आहे.
बसंत पंचमी पूजाविधी:
बसंत पंचमी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. ह्या दिवशी माता सरस्वतीची विधी पूर्वक पूजा अर्चा करा. माता सरस्वतीच्या मूर्ती किंवा प्रतिमाला पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला . पूजेमद्धे रोली, मौली, हळद, केशर, अक्षता, पिवळी व पांढरी फूल, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा. पूजेमद्धे वाद्य संगीत यंत्र व पुस्तक ठेवा व मनोभावे नमस्कार करा.