२८ जानेवारी 2023 रथ सप्तमी सूर्य पूजेचे महत्व व शुभ मुहूर्त
हिंदू पर्वमध्ये एक पर्व म्हणजे रथ सप्तमी आहे. जिला सक्सेससाठी खूप खास मानली जाते. चला तर मग आपण पाहू या रथ सप्तमी मुहूर्त व महव काय आहे.
हिंदू धर्ममध्ये सूर्य उपासना खूप महत्व पूर्ण मानली जाते. खर म्हणजे सूर्य देवाची पूजा रोज करायला पाहिजे. परंतु सूर्य देवाच्या पूजनाचे काही विशिष्ट पर्व सुद्धा बनवले आहेत. आताच काही दिवसांपूर्वी मकर संक्रांती हा सण पार पडला तर आता सूर्य पूजाचा सर्वात मोठा पर्व म्हणजे रथ सप्तमी येत आहे.
The text 28 January 2023 Ratha Saptami Importance of Surya Puja in Marathi be seen on our You tube Chanel Ratha Saptami Importance
दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी सुद्धा शुक्ल पक्ष सप्तमी ह्या तिथीला रथ सप्तमी साजरी करायची आहे. ह्या वर्षी रथसप्तमी २८ जानेवारी २०२३ शनिवार ह्या दिवशी आहे.
रथसप्तमी मुहूर्त:
सप्तमी तिथी आरंभ २७ जानेवारी २०२३ शुक्रवार सकाळी ९ वाजून १० मिनिट
सप्तमी तिथी समाप्ती २८ जानेवारी २०२३ सकाळी ८ वाजून ४३ मिनिट
सूर्योदय च्या अनुसारच रथसप्तमी साजरी करायची आहे त्यामुळे २८ जानेवारी २०२३ शनिवार ह्या दिवशी साजरी करायची आहे.
रथसप्तमी शुभ मुहूर्त म्हणायचे तर २८ जानेवारी ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्तची वेळ सर्वात शुभ आहे. त्याच बरोबर स्नान करण्याची ही वेळ सुद्धा शुभ आहे.
स्नान मुहूर्त रथ सप्तमी २८ जानेवारी सकाळी ५ वाजून २९ मिनिट पासून सकाळी ७ वाजून १४ मिनिट पर्यन्त आहे.
रथ सप्तमी 2023 महत्व (Ratha Saptami 2023 Mahatva)
रथ सप्तमीचे महत्व बरेच आहे. रथ सप्तमीच्या दिवशी फक्त सूर्य भगवानचीच पूजा करीत नाहीत तर सूर्य भगवान ह्याच्या रथाच्या ७ घोड्यांची सुद्धा पूजा करणे महत्वाचे आहे.
रथ सप्तमी ह्या दिवशी सूर्य व त्यांच्या घोड्यांची पूजा केल्याने जीवनात सफलता मिळते. प्रतेक कामात यश मिळते व व्यक्तिच्या व्यक्तित्वमध्ये तेज येते. भाग्योदय होऊन शुभ समाचार मिळतो.
रथ सप्तमी ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने सूर्य देवाची कृपा मिळते. त्याच बरोबर पापांपासून मुक्ती मिळते. आपले आरोग्य, धन व संतानची प्राप्ती होते. व शारीरिक कष्टा पासून मुक्ती मिळते.
महाराष्ट मध्ये रथ सप्तमीचे महत्व जास्त आहे कारणकी मकर संक्रांत पासून रथ सप्तमी पर्यन्त विवाहित महिला सुवासिनी महिलाना घरी बोलवून हळदी-कुंकू करतात. त्याना हळद-कुंकू लावून तिळगूळ देवून त्यांना भेट म्हणून वाण देतात. तसेच नवी नवरीचे हळदी-कुक्कु तीळ हळव्याचे दागिने घालून करतात. लहान मुलांचे बोर नहाण करतात. रथ सप्तमी हा दिवश हळदी-कुक्कु करण्याचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे धूम धडाक्यात साजरा करतात.