नवीन वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी 2023 मुहूर्त महत्व पूजाविधी
प्रतेक महिन्यातील कृष्ण पक्ष मधील चौथ्या दिवसाला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. संकष्टी चतुर्थी हा दिवस भगवान श्री गणेश ह्यांचा आहे व ह्या दिवशी त्यांची पूजा अर्चा करतात. संकष्ट चतुर्थी ह्या दिवसाला संकटावर मात असे म्हंटले जाते.
The text Angarki Chaturthi 2023 Muhurat Mahatva Puja Vidhi Mantra in Marathi be seen on our You tube Chanel Angarki Chaturthi 2023
संकष्टी चतुर्थी मंगळवार ह्या दिवशी आली तर त्याला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात व हा दिवस सर्व चतुर्थीमध्ये शुभ दिवस मानला जातो. अंगारकी चतुर्थी ह्या दिवशी जो भक्त संपूर्ण दिवस उपवास करून आराधना करील त्याला भगवान गणेश व मंगल देव ह्या दोघांचे आशीर्वाद प्राप्त होतील. असा भक्त कधी सुद्धा समस्यांचा सामना न करता आपले जीवन सुखी व समाधानी व्यतीत करील. त्याच बरोबर ज्यांच्या कुंडलीमद्धे मंगळ दोष आहे त्याचा प्रभाव सुद्धा कमी होईल.
अंगारकी चतुर्थी ह्या वर्षी 10 जानेवारी मंगळवार ह्या दिवशी आहे. ह्या चतुर्थीला संकट चौथ किंवा तिळ चौथ असे सुद्धा म्हणतात. चंद्रोदय मुहूर्त : रात्री 9 वाजून 8 मिनिट
अंगारकी चतुर्थी 10 जानेवारी 2023 मंगळवार
चंद्रोदय मुहूर्त : रात्री 9 वाजून 8 मिनिट
अंगारकी चतुर्थी पूजाविधी: (Sankashti Chaturthi pooja vidhi) :
संकष्टी चतुर्थी च्या दिवशी सूर्योदयच्या पहिले पाण्यात तिळ टाकून स्नान करावे. मग उत्तर दिशेला तोंड करून भगवान गणेश ह्यांची पूजा करावी. गणेशजींना तिळ, गूळ, लाडू, दूर्वा व चंदन अर्पित करा. त्याच बरोबर गणपती बापांचे अतिप्रिय मोदकचा नेवेद्य दाखवा. ह्या व्रतामध्ये तिळाचे जास्त महत्व आहे. त्यामुळे तिळ वापरुन मग अर्ध्य द्या. पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी सूर्यास्त नंतर भगवान गणेश ह्यांची पूजा करून चंद्रोदय झाला की नेवेद्य दाखवून चंद्राला अर्ध्य दिले पाहिजे मग उपवास सोडावा. उपवास सोडताना तिळाचा एखादा पदार्थ सेवन केला पाहिजे.
संकष्टी चतुर्थी का महत्व (Sankashti Chaturthi Importance) :
संकष्टी चतुर्थी चा अर्थ संकटांवर मात करणारी होय. ह्या दिवसाचे व्रत केल्यास गणेश भगवान प्रसन्न होतात व आपली संकट दूर होतात व आपल्या मुलांना दीर्घायुषचा आशीर्वाद देतात. असे सुद्धा म्हणतात की पौराणिक मान्यता अनुसार ह्या दिवशी भगवान शिव ह्यांनी श्री गणेश ह्यांना हत्तीचे डोके लाऊन संकट दूर केले होते. म्हणून ह्या दिवसाला संकष्टी चतुर्थी म्हणून पूजा अर्चा करतात ह्या दिवशी उपवास करून श्री गणेश ह्यांची कथा आईकतात.
पौराणिक कथा:
पौराणिक मान्यता अनुसार एकदा मंगल देवनी भगवान गणेश ह्यांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या करण्याचे ठरवले व त्यांची तपस्या पाहून श्री गणेश त्यांना प्रसन्न सुद्धा झाले व त्यांनी मंगल देवना वरदान दिले की जो कोणी व्यक्ति मंगळवार ह्या दिवशी चतुर्थीचे व्रत करील त्या व्यक्तीची सर्व संकट दूर होऊन आशीर्वाद मिळेल.
अंगारकी चतुर्थी ह्या दिवशी पुढील मंत्र 108 वेळा म्हणावा:
“ॐ गं गणपते नम: “