गणेश जयंती २०२३ शुभ मुहूर्त, महत्व, पूजाविधी व उपाय केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील
हिंदू पंचांग अनुसार माघ शुक्ल पक्ष ह्या तिथीला २५ जानेवारी २०२३ बुधवार ह्या दिवशी श्री गणेश जयंती साजरी करायची आहे. ह्या श्री गणेश चतुर्थीला माघ विनायक चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असे सुद्धा म्हणतात.
The text Ganesh Jayanti 2023 Puja Muhurat, Puja Vidhi, Mahatva W Upay in Marathi be seen on our You tube Chanel Ganesh Jayanti 2023 Puja Muhurat, Puja Vidhi, Mahatva W Upay
गणेश जयंती ह्या दिवशी गणेश भगवान ह्याचा जन्म झाला होता. ह्या दिवशी भगवान शिव व पार्वती माता ह्यांचे सुपुत्र गणेश ह्यांची मनोभावे विधिपूर्वक पूजा अर्चा केली जाते. ह्या दिवशी गणेश भक्त मनोभावे व्रत, पूजा अर्चा व मंत्रपाठ करील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व संपूर्ण वर्ष श्री गणेशजीनची कृपा भक्तावर राहून शुभ फळ मिळतात असे म्हणतात.
गणेश जयंती 2023 तिथि:
माघ शुक्लपक्ष तिथी आरंभ: २४ जानेवारी २०२३ मंगळवार दुपारी ३ वाजून २२ मिनिट
माघ शुल्कपक्ष तिथी समाप्ती: २५ जानेवारी २०२३ बुधवार दुपारी १२ वाजून ३४ मिनिट
श्री गणेश जयंती २५ जानेवारी २०२३ बुधवार ह्या दिवशी साजरी करायची आहे.
गणेश जयंती पूजा विधि:
* श्री गणेश जयंती ह्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून गणेश भगवान ह्याचा व्रत संकल्प करावा.
* मग चौरंगवर लाल रंगाचे कापड घालून गणेशजीनची मूर्ती किवा फोटोची स्थापना करावी व त्यावर गंगाजल शिंपडुन नमस्कार करावा.
* गणेशजींच्या फोटो किंवा मूर्तीवर हळद-कुंकू लावावे व दिवा-अगरबत्ती लावावी.
* श्री गणेश ह्यांना त्याच्या आवडतीचे लाल गुलाब किंवा जास्वंदी फूल, २१ दूर्वा, लाल सिंदूर, मोदक किंवा लाडू अर्पित करून घरातील सर्व सदस्यांनी आरती म्हणा.
गणेश जयंती महत्व:
श्री गणेश ही बुद्धीचे देवता आहेत. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनात शुभ फळ मिळतात. त्याच बरोबर गणेश भगवान आपल्या जीवनात येणारी संकट दूर करतात. म्हणूनच गणेश जयंती ह्या दिवशी श्री गणेश भगवान ह्यांचे व्रत, पूजा अर्चा व काही उपाय करावे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळेल.
गणेश जयंती ह्यादिवशी करावयाचे उपाय:
* गणेश चतुर्थी ह्यादिवशी श्री गणेश भगवान ह्यांच्या मूर्तीची किंवा फोटोची प्राण प्रतिष्ठा करून त्यांची नियमित पूजा अर्चा करा. त्यामुळे कुंडलीमधील बुध ग्रह जर कमजोर असेलतर त्यामध्ये सुधारणा होईल व बुध ग्रहाच्या दोषा पासून शांती मिळेल.
* गणेश चतुर्थी ह्या दिवशी गणेश मंदिरमध्ये जाऊन हिरव्या रंगाची वस्तु दान करा. ज्याना जरूरत आहे किंवा गरीब व्यक्तीला हिरव्या रंगाचे वस्त्र दान करा. त्यामुळे आपल्या कुंडलीमधील बुध ग्रह दोष दूर होऊन आपली कामे पूर्ण होतील.
* भगवान गणेशजीनची कृपा मिळण्यासाठी गणेश चतुर्थी ह्या दिवशी हिरव्या मुगाची डाळ व तांदूळ दान करावे किंवा पक्षांना खायला द्यावे.
* श्री गणेश भगवान ह्यांना दूर्वा अतिप्रिय आहेत. चतुर्थी च्या दिवशी गणेश मंदिर मध्ये जाऊन ११ किंवा २१ दूर्वाची जुडी अर्पित केल्याने आपल्या जीवनातील परेशानी दूर होतील.