पारंपारिक झटपट हरभऱ्याच्या पानांची (हरबऱ्याच्या पानांची) पौष्टिक गुणकारी भाजी
आता जानेवारी महिना चालू आहे. तर बाजारात आपल्याला हरबऱ्याच्या ढाळया किंवा हरबऱ्याची कोवळी पाने मिळतात. आपण हरबऱ्याची उसळ किंवा पुलाव बनवतो पण आपल्याला माहीत आहे का? हरबऱ्याच्या पानाची भाजी खूप आरोग्यदाई आहे.
हरबऱ्याच्या पानात प्रोटिन, कॅल्शियम आहे त्यामुळे आपली हाडे व मसल्स मजबूत बनतात. कार्बोहायड्रेट आहेत त्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होते. हरबऱ्याच्या पानात कोलेस्ट्रॉल नसते त्यामुळे हार्टचे आरोग्य चांगले म्हणजेच फायदेमंद आहे. पोट्याशियम आहे त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
चलातर मग आपण पाहू या हरबऱ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची.
बनवण्यासाठी वेळ १०-१२ मिनिट
वाढणी: ४ जणसाठी
साहित्य:
२ कप हरबऱ्याची पाने (कोवळी)
७-८ लसूण पाकळ्या
२-३ हिरव्या मिरच्या
२ टे स्पून शेगदाणे कूट
१ टे स्पून तेल
मीठ चवीने
कृती:
प्रथम हरबऱ्याची कोवळी पाने घेऊन स्वच्छ धुवून बाजूला ठेवा. लसूण सोलून ठेचून घ्या. मिरची तुकडे करून घ्या.
एक कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण व हिरवी मिरची घालून थोडीशी गरम करून घ्या. मग त्यामध्ये धुतलेली पाने घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी घाला. मग मंद विस्तवावर भाजी ५-७ मिनिट शिजवून घ्या. झाकण काढून एकदा पहा भाजी शिजली का नाहीतर अजून २-३ मिनिट शिजवून घ्या.
आता त्यामध्ये शेगदाणा कूट व मीठ घालून मिक्स करून एक चांगली वाफ येऊ द्या.
गरम गरम हरबऱ्याच्या पानांची भाजी भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.