मकर संक्रांत स्पेशल तिळ लाडू बिना पाकाचे झटपट 2 मिनिटांत
मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे. महाराष्ट्रात हा सण महिला अगदी आनंदाने साजरा करतात. घरोघरी विवाहित महिलांना घरी हळदी कुंकूला बोलवतात व त्याना हळद-कुंकू देवून त्याना छान वाण देवून तिळ व तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या देतात.
The text Makar Sankrant Special Sesame Ladoo | Til Ladu Without Syrup in Marathi be seen on our You tube Chanel Makar Sankrant Special Sesame Ladoo | Til Ladu Without Syrup
मकर संक्रांत जवळ आली की आपण गूगलवर सर्च करतो तिळाचे लाडू कसे बनवायचे. तिळाचे लाडू आपण अगदी झटपट 2 मिनिटात बनवू शकतो ते पण पाक न बनवता. गुळाचा किंवा साखरेचा पाक बनवताना कधी घट्ट होतो तर कधी बिघडतो. तर त्यासाठी बिना पाकाचे लाडू बनवा पाक बनवायची गरज नाही.
मकर संक्रांत स्पेशल तिळ लाडू बिना पाकाचे बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत. तसेच तोंडात टाकताच विरघळतील असे टेस्टी सुद्धा आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 35-40 लाडू बनतात
साहित्य:
2 कप तिळ (पॉलिश)
1 1/2 कप गूळ
1/2 कप डेसिकेटेड कोकनट
2 टे स्पून साजूक तूप
1 टी स्पून वेलची पाउडर
कृती:
प्रथम तिळ निवडून घ्या. गूळ किसून घ्या. तिळ पॉलिश किंवा साधे वापरले तरी चालेल. कढई विस्तवावर गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये तिळ घालून मंद विस्तवावर गरम करून घ्या. खूप भाजायचे नाही. गरम झालेकी विस्तव बंद करून थंड करायला ठेवा. म्हणजेच तिळाचा कचट असा वास येणार नाही व लाडू छान खमंग सुद्धा लागतील.
तिळ थंड झाल्यावर मिक्सरच्या भाड्यात फक्त एकदा म्हणजे 5 सेकंड ब्लेंड करून घ्या. मग त्यामध्येच किसलेला गूळ, डेसिकेटेड कोकनट, वेलची पावडर व साजूक तूप घालून परत एकदा ब्लेंड करून घ्या.
आता मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊन चांगले मळून घ्या व छोटे छोटे लाडू बनवून एका प्लेटमध्ये ठेवा. त्यानंतर एका स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.