मकर संक्रांत स्पेशल झटपट तीळ लाडू बिना साखर बिना गूळ बिना पाक रेसिपी
आता थंडीचा सीझन चालू झाला आहे. तर थंडीच्या दिवसात तीळ सेवन करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. तीळ सेवनाने आपल्या शरीरास शक्ति, पोषण व ऊर्जा मिळते. तीळ नेहमी चावून खाल्ले पाहिजे. त्यामुळे आपल्या दाताचे आरोग्य उत्तम रहाते. मुलांना तीळचे लाडू रोज खायला दिल्यास मुले धष्ट पुष्ट बनतात. नारळ सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावह आहे.
The text Makar Sankrant Special Til Sesame Ladoo Without Sugar/Jaggery in Marathi be seen on our You tube Chanel Makar Sankrant Special Til Sesame Ladoo Without Sugar/Jaggery
थंडीच्या दिवसांत खजूर सेवन करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. खजूर हे पौस्टीक शक्ति वर्धक व धातू वृद्धी करतात. खजुरात जीवनस्त्व “A” “B” व “C” भरपूर प्रमाणात आहे. खजुरात लोह तांबे फॉस्फरस कैलशियम आहे “A” जीवनसत्व मुळे आवयवांचा चांगला विकास होतो “B” मुळे हृदय शरीर व इंद्रीय सुदृढ राहतात. पचन शक्ती वाढते.
आता आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवताना आपण साखर किंवा गूळ वापरणार नाही, आपण मस्त पैकी खजूर वापरुन तिळाचे लाडू बनवणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 25-30 लाडू बनतात
साहित्य:
300 ग्राम खजूर
1 कप तीळ (पॉलिश किंवा साधे)
1/4 कप काजू (तुकडे करून)
1/4 कप डेसिकेटेड कोकानट
1 टी स्पून वेलची पावडर
1 टी स्पून साजूक तूप
सजावटी साठी:
3 टे स्पून डेसिकेटेड कोकानट
3 टे स्पून तीळ (पॉलिशचे)
कृती:
खजुर चांगला धुवून पुसून घ्या. मग त्याच्या बीया काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. काजूचे बारीक तुकडे करून घ्या.
एका कढईमध्ये तीळ छान खमंग भाजून घ्या तीळ भाजताना मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. तीळ चांगले गरम झालेकी तडतडल्याचा आवाज येईल मग विस्तव बंद करा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर ग्राईड करून घ्या.
कढमध्ये तूप गरम करून त्यामध्ये खजूर घालून थोडेसे परतून घ्या. खजूर गरम झालेकी मऊ होतील. खजूर मऊ झालेकी विस्तव बंद करा. मिक्सरच्या भांड्यात खजूर थोडे जाडसर ग्राईड करून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात खजूर, तीळची पावडर, वेलची पावडर घालून थोडेसे ग्राईंड करा मग मिश्रण परातीत काढून घ्या. त्यामध्ये डेसिकेटेड कोकानट व काजूचे तुकडे घालून परत चांगले मळून घ्या. मळलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
एका बाउलमध्ये डेसिकेटेड कोकानट व दुसऱ्या बाउलमध्ये तीळ घ्या. मग एक छोटा लाडू घेऊन डेसिकेटेड कोकनट मध्ये घोळून घ्या. दूसरा लाडू घेऊन तीळमध्ये घोळून घ्या. अश्या प्रकारे सर्व लाडू डेसिकेटेड कोकनट व तीळवर घोळून घ्या. मग स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.