मकर संक्रांतीला काळेच कपडे का घालावे? | संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे शुभ आहेत?
मकर संक्रांतीला हा रंग परिधान करणे घातक
मकर संक्रांती ह्या वर्षी 15 जानेवारी 2023 रविवार ह्या दिवशी आहे.
मकर संक्रांती पूजा मुहूर्त:
सकाळी 7 वाजून 15 मिनिट ते संध्याकाळी 7 वाजून 46 मिनिट पर्यन्त
संक्रांत वाहन व स्वरूप:
संक्रांत ह्या वर्षी वाघावर बसून येत असून उपवाहन घोडा आहे. तसेच पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा आहे, कपाळावर केशरी टिळा आहे. हातात सुवासिक जाईचे फूल असून नाव मंदाकिनी आहे.
The text Makar Sankranti 2023 in Marathi be seen on our You tube Chanel Makar Sankranti La Kale Kapde Ka Ghaltat
संक्रांत दक्षिण दिशेहून उत्तर दिशेला जात असून ईशान्य दिशेला पहात आहे.
मकर संक्रांती ह्या दिवशी देवी निरनिराळे रंगाचे कपडे परिधान करते. ह्या वर्षी सुद्धा पंचांग नुसार देवीने वस्त्र परिधान केलेले आहे. ह्या वर्षी देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये.
मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे:
काळे, लाल, केशरी, हिरवा, गुलाबी
मकर संक्रांती ह्या दिवशी अगदी आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. पण काळा रंग काही जण वापरत नाही तो अशुभ मानतात. पण मकर संक्रांती ह्या दिवशी काळ्या रंगाचे महत्व आहे. नवीन लग्न झालेली नवरीला आवर्जून काळ्या रंगाची साडी देतात.
पांढरा रंग जशी उष्णता परिवर्तीत करतो म्हणजे उष्णता शोषून घेत नाही तसेच काळा रंग उष्णता शोषून घेत नाही. मकर संक्रांती हा सण थंडीच्या सीझनमध्ये येतो. त्यामुळे थंडीचा त्रास होऊ नये व शरीर उबदार रहावे ह्या साठी काळे कपडे परिधान करतात. तसेच ह्या दिवशी तिळगूळ देतात ह्याचे कारण तिळ व गुळामध्ये उष्णता आहे ती आपल्या शरीराला ऊर्जा देते व आपले शरीर तंदुरुस्त ठेवते.
मकर संक्रांतीला रात्र मोठी असते. म्हणून काळोख्या रात्रीला काळी वस्त्र परिधान करून निरोप दिला जातो. तसेच काळा रंग नजर लागू नये किंवा नकारात्मक शक्तिचा आपल्यावर परिणाम होऊ नयेम्हणून सुद्धा घालतात.
लाल रंग हा लक्ष्मी मातेचा रंग आहे. ह्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केलेतर लक्ष्मी मातेची कृपा लवकर होईल असे म्हणतात.
केशरी रंग हा गणपती बाप्पाचा आहे त्यामुळे तो शुभ आहे.
हिरवा रंग सौभाग्यवतीचा आहे त्यामुळे हा रंग जरूर घालावा.
गुलाबी रंग सुद्धा चालू शकतो.
पोपटी किंवा मोरपंखी रंग सुद्धा घालू शकता.
अजून एक माहिती अशी आहे की मकर संक्रांती ह्या दिवशी संक्रांत दक्षिण दिशेहून उत्तर दिशेला जात असून ईशान्य दिशेला पहात आहे. म्हणून दक्षिण उत्तर ह्या दिशेला झोपू नये किंवा जेवायला बसू नये.