टिप्स | ट्रिक्स – 10 चमत्कारी किचन टिप्स स्वयंपाक करताना वापरुन पहा
कुकिंग करताना पुढे देलेल्या किचन टिप्स खूप कामाच्या आहेत. ह्या टिप्स वापरुन आपल्याला मुश्किल वाटणारे काम अगदी सोपे होईल.
The text Tricks & Tips 10 Amazing Kitchen Tips While Doing Cooking Recipes in Marathi be seen on our You tube Chanel Tricks & Tips 10 Amazing Kitchen Tips
खर म्हणजे किचन मधील काही कामे मुश्किल असतात व आपल्याला भीती सुद्धा वाटत असते की आपली डिश बिघडणार तर नाही ना? आज आम्ही अश्या काही टिप्स व ट्रिक्स देत आहोत त्यामुळे आपले किचन मधील काम सोपे व आकर्षक सुद्धा दिसेल. त्याच बरोबर आपल्या पकवानाचा स्वाद सुद्धा वाढेल. जर आपण आपले कुकिंग करताना नवीन नवीन एक्सपेरिमेंट करणे पसंद करीत असाल तर पुढे दिलेल्या १० चमत्कारी टिप्स व ट्रिक्स नक्की आचरणात आणा खूप फायदेमंद आहेत.
कुकिंग पासून ते चॉपिंग पर्यन्त ह्या टिप्स आपल्याला मदत करतील. ह्या १० टिप्स आपल्या रोजच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करतील.
१. बर्गर सॉस बनवण्याचा सोपा उपाय:
बर्गर सॉस आपण घरी सुद्धा बनवू शकता. बर्गर सॉस बनवण्यासाठी फक्त काही इंग्रेडिएंट्स पाहिजेत. त्यासाठी २ टे स्पून मियोनीज सॉस, १ टे स्पून टोमॅटो केचप, १/२ टी स्पून रेड चिली सॉस, १/४ टी स्पून काळी मिरी पावडर, व १/२ टी स्पून सुंठ पावडर मिक्स करा. जर आपल्याला आवडत असलेतर लसूण पावडर सुद्धा मिक्स करू शकता. मग आपण ह्या सॉसचा वापर बर्गर सॉस म्हणून किंवा डिप साठी सुद्धा वापरू शकता.
२. झटपट बनवा भाजीसाठी पेस्ट:
भाजी किंवा आमटी बनवताना आपण आल-लसूण पेस्ट बनवतो. जर आपल्याकडे मिक्सर नाही तर आपण किसणीवर किसून मग वापरू शकतो. आपण पाहिजेतर टोमॅटो सुद्धा किसणीवर किसून वापरू शकता. किंवा कांदा किंवा इतर कोणत्या भाज्या सुद्धा. अश्या प्रकारची पेस्ट बनवण्याची पद्धत बरेच जुनी व कॉमन आहे त्यामुळे बराच वेळ वाचतो.
३. गुळाचा वापर करून चहा बनवतात ही ट्रिक वापरुन पहा:
गुळाचा चहा बनवताना आपण दूध वापरतो तर दूध नसते, अश्या वेळी गूळ घालताना अगदी शेवटी घाला. चहामध्ये चहा पत्ती व आले पहिले घालून उकळून मग दूध घालून एक उकळी आली की गॅस बंद करून गूळ पावडर टाकून मिक्स करून एक मिनिट झाकून ठेवा मग गाळून सर्व्ह करा. त्यामुळे दूध सुद्धा नासणार नाही. आपल्याला पाहिजे तर आपण कपामद्धे सुद्धा गूळ घालू शकता.
४. पोट्याटो बॉल्स बनवा अश्या सोप्या पद्धतीने
जेव्हा आपण पोट्याटो बॉल किंवा चीज बॉल बनवतो तेव्हा त्याला डबल कोट करा. ब्रेड क्रब्म किंवा मैदा वापरणार असाल तर दोन वेळा त्यामध्ये रोल करा. मग तेलात फ्राय करा. म्हणजे ते तुटणार नाहीत.
५. पिनट बटर बनवण्याचा सोपा उपाय:
पिनट बटर आपण घरी सुद्धा अगदी मार्केट सारखे बनवू शकतो. घरी पिनट बटर बनवताना मिक्सरमध्ये शेगदाणे बारीक करताना त्यामध्ये १/४ चमचा मीठ घाला. शेगदाणे चांगले भाजून झाल्यावर त्याची साले काढा. मिक्सरमध्ये शेगदाणे बारीक करताना मिक्सर बंद करून मिश्रण चमचानि वरखाली करून मग परत बारीक करा असे दोन वेळा करा. असे केल्याने शेगदाणा मधील तेल सुटू लागेल व पिनट बटर तयार होईल.
६. टिक्की छान क्रिस्पी होण्यासाठी
खर म्हणजे टिक्की बनवताना उकडलेले बटाटे वापरतात पण आपण त्यासाठी कच्चे बटाटे सुद्धा वापरू शकतो. त्यामुळे पकोडे किंवा टिक्की छान क्रिस्पी होते. त्यासाठी पहिल्यांदा बटाट्याची साल काढून किसून घ्या. मग स्वच्छ पाण्यात घालून हातानी दाबून बटाट्यामधील पाणी काढा. मग तो कीस वापरुन पकोडे किंवा टिक्की बनवा. तसेच ते तळताना गॅस फ्लेम मिडियम ठेवा. जर मोठ्या फ्लेम वर तळले तर लवकर तळून होतील पण लगेच नरम पडतील व आतून कच्चे राहतील.
७. मासे त्याचा वास दूर कसा करायचा
आपण पाहिले असेल जेव्हा घरात मासे तळताना त्याचा वास अगदी दूर पर्यन्त जातो. त्यासाठी एक ट्रिक आहे ती आपण करून पहा. मासे स्वच्छ धुवून एका प्लेट मध्ये ठेवा त्यावर हळद, मीठ, लाल मिरची पावडर, लिंबूरस लावून ठेवा मग फ्राय करा असे केल्याने माशाची दुर्गंधी येणार नाही. मासे तळताना आधी तेल चांगले गरम करून घ्या. मग मग त्यामध्ये मासे फ्राय करा.
८. हॉटेल सारखी गेव्ही कशी बनवायची
आपण घरी गेव्ही बनवताना किंवा ग्रेव्हीची भाजी बनवताना पहिले आपण मसाला परतून घेतो मग नॉर्मल पाणी घलतो त्या आयवजी गरम पाण्याचा उपयोग करा. त्यामुळे ग्रेव्हीची टेस्ट स्वादिष्ट लागते व रंग सुद्धा छान येतो. तसेच आपल्याला घट्टसर हॉटेल सारखी ग्रेव्ही आवडत असेलतर गरम पाणी वापरा.
९. मेदूवडा बनवण्याची सोपी पद्धत
वडा बनवणे ही काही सोपे काम नाही. उलट परफेक्ट शेप देणे खूप कठीण आहे. जर आपण वडे बनवताना हातानी शेप देत असालतर तसेन करता एक स्टीलच्या वाटीचा उपयोग करा. त्यासाठी एक स्टीलची वाटी घेऊन त्याच्या बाहेरील बुडाच्या भागाला थोडेसे पाणी लाऊन त्यावर वड्याचे बैटर लावावे मग बोटाच्या सहायानी वड्याचा आकार देवून मध्य भागी गोल आकार द्यावा व गरम तेल करून हळुवार पणे वड्याची बाजू तेलात सोडावी. त्यामुळे वड्याला छान शेप येतो.
१०. लोणच्याला फंगस येण्या पासून कसे वाचावे.
जेव्हा आपण भाज्या वापरुन लोणचे बनवतो तेव्हा प्रथम भाज्या स्वच्छ धुवून पुसून घ्या मगच चिराव्या. चिरल्यावर मग धुवू नये. खास करून जेव्हा इन्स्टंट लोणचे बनवतो तेव्हा. भाज्या, लसूण व मिरच्या धुवून, सुकवून मगच वापराव्या. कमीत कमी ५ तास तरी. असे केल्याने मान्सून मध्ये लोणच्याला फंगस लागणार नाही.