18 फेब्रुवरी २०२३ महाशिवरात्रि पूजा मुहूर्त पूजाविधी महत्व बेलपत्र नियम व मंत्र
महाशिवरात्रि भगवान शिव ह्याचा अगदी पावन उत्सवाचा दिवस आहे. महाशिवरात्री हा सण संपूर्ण भारतात अगदी धूम धडाक्यात साजरा करतात.
महाशिवरात्री हा दिवस शिव भक्तासाठी अगदी उस्तवाचा दिवस आहे. महादेवचे भक्त वर्षभर महाशिवरात्रीची अगदी आतुरतेने वाट पहात असतात. महाशिवरात्री हा दिवस माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी ह्या दिवशी साजरा करतात.
महाशिवरात्रीचे व्रत ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आपले दुख कष्ट दूर होतात, भय मुक्ती मिळते त्याच बरोबर शिव कृपा मिळून आरोग्य चांगले राहते व सुख सौभाग्य वाढते. महाशिवरात्री हा दिवस शिव भगवान ह्यांची आराधना करण्यासाठी उत्तम दिवस आहे.असे म्हणतात की एक लोटा जल त्यांना अर्पित केले की ते प्रसन्न होतात.
महाशिवरात्री 2022 तिथी:
पंचांगनुसार महाशिवरात्री १८ फेब्रुवारी २०२३ शनिवार ह्या दिवशी आहे.
१७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रात्री ८ वाजून २ मिनिट पासून सुरुवात
१८ फेब्रुवारी २०२३ शनिवार संध्याकाळी ४ वाजून १८ मिनिट पर्यन्त
बेलपत्र वाहताना नियम:
महाशिवरात्री ह्या दिवशी शिवलिंगवर बेल पत्र वाहणे खूप महत्वाचे आहे तसेच बेल पत्र वाहताना बेलपत्राची चकाकी असणारी बाजू शिवलिंग वर असावी म्हणजे उलटे बेलपत्र वहावे.
महाशिवरात्री ह्या दिवशी बेलपत्र तोंडताना काही नियम आहेत. असे म्हणतात की चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी व अमावस्या ह्या तिथिला व संक्रांति ह्या तिथीला बेलपत्र तोडू नये. म्हणजेच ह्या तिथीच्या अगोदर बेलपत्र तोंडलेले वाहिले पाहिजे.
महाशिवरात्रिचे महत्व:
हिंदू पौराणिक कथा अनुसार असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान शंकर व माता पार्वती ह्यांचा विवाह संपन्न झाला होता. म्हणून ह्या दिवशी व्रत केलेले फलदाई असते. खर म्हणजे शिवायल मध्ये जाऊन पूजा करणे जास्त फलदाई असते पण जर काही कारणाने आपण शिवालय मध्ये जाऊ शकत नसाल तर आपण घरी सुद्धा यथासांग पूजा करू शकता.
महाशिवरात्री पूजाविधी:
फाल्गुन मास मधील महाशिवरात्री सर्वात मोठी शिवरात्र आहे. ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्तवर उठून स्नान करावे. मग एक कलश पाणी भरून स्थापन करून शंकर पार्वतीची मूर्ती स्थापना करावी पंचामृतनि अभिषेक करावा चंदनाचा टिळा लावावा. मग अक्षता, पान, सुपारी, रोली, मौली, चंदन, लौंग, इलायची, दूध, दही, मध, तूप, धतूरा, बेलपत्र, कमलगट्टा ह्या सर्व वस्तु अर्पित कराव्या. मग खिरीचा नेवेद्य दाखवावा आरती म्हणून ॐ नमो भगवते रूद्राय, ॐ नमः शिवाय, रूद्राय शम्भवाय भवानीपतये नमो नमः मंत्र का जाप करावा.
महामृत्युंजय मंत्र म्हणावा:
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्।।