समुद्रशास्त्रानुसार शरीराच्या कोणत्या भागावरील तिळ शुभ मानले जात नाही
समुद्रशास्त्रा नुसार शरीरावर तिळ असणे शुभ संकेत आहेत का अशुभ संकेत आहेत ते सांगितले आहे. पण त्याच्या मध्ये असे सांगितले आहेकी तिळ हा खूप छोटासा नाही असला पाहिजे. तिळ मोठा असेलतर त्याचा प्रभाव जास्त पडतो अन्यथा नाही.
The text According To Samudra Shastra On Which Part Mole Is Inauspicious in Marathi be seen on our You tube Chanel According To Samudra Shastra On Which Part Mole Is Inauspicious
चलातर मग पाहूया शरीराच्या कोणत्या भागावर तिळ असणे शुभ नाही:
१) समुद्रशास्त्रमध्ये असे सांगितले आहेकी उजव्या बाजूच्या भुवईवर तिळ असणे म्हणजे सुखा मध्ये वृद्धी होते. हा तिळ आपल्या विवाहिक जीवनात प्रेमाचे शुभ फळ देतो. जे डाव्या बाजूच्या भुवईवर तिळ असेलतर विवाहिक जीवनात अडचणीचा सामना करावा लागतो.
२) शास्त्रनुसार मान व खांदा ह्याच्या जोडाच्या ठिकाणी तिळ असणे शुभ तसेच फलदाई नसते. जर मागे मानेवर तिळ असेलतर शुभ संकेत आहेत. अशी व्यक्ति कर्मठ व जीवनात सफलता मिळवणारी असते. गळ्यावर तिळ असणे व्यक्तिला दीर्घायुष व चांगला आवाज मिळतो.
3) समुद्रशास्त्र मध्ये असे सांगितले आहेकी स्त्री असो अथवा पुरुष ह्यांच्या काखेत तिळ असणे शुभ नसते. ज्यांच्या काखेत तिळ आहे त्याना आर्थिक हानीला सामोरे जावे लागते.
4) ज्या व्यक्तिच्या नाकावर पुढच्या भागावर तिळ आहे त्यांना भोग-विलास मध्ये जास्त रुचि असते. समुद्रशास्त्रनुसार नाकावर उजव्या बाजूला तिळ असणे म्हणजे अगदी कमी श्रमात अधिक लाभ होतो. तसेच नाकाच्या डाव्या बाजूला तिळ असणे अशुभ असतो त्याना खूप परिश्रम करून सुद्धा कामामध्ये लाभ व सफलता लवकर मिळत नाही.
5) कानाच्या पाळीवर तिळ असणे पारिवारीक दृषीने शुभ नसते. त्याचे कारण असे आहेकी कानाच्या पाळीवर तिळ असणे व्यक्तिच्या जीवनात वैराग्य आणते. त्याच बरोबर व्यक्तिची परिवारीक जिम्मेदारी व विवाहिक जीवनात रुचि कमी असते.
6) ज्या स्त्री अथवा पुरुषाच्या दोन्ही खांद्यावर तिळ असेलतर जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. त्यांना जीवनात सफलता सहजपणे मिळत नाही.
7) पायाच्या बोटांवर तिळ असणे शुभ नसते. अशी व्यक्ति आपल्या जीवनात स्वतःच्या बुद्धीचा वापर न करिता दुसऱ्यांच्या बुद्धीचा वापर करीत असते. अशी लोक दुसऱ्यांकडे नोकरी करीत असतात. स्वतंत्र पणे आपल्या जीवनात पुढे जाणे त्याना कठीण जाते. जर पायाच्या अंगठ्यावर तिळ असणे शुभ असते. त्यामुळे समाजात प्रतिष्ठा मिळते.
8) मागील खालच्या बाजूस तिळ असणाऱ्यांनी आर्थिक कामात सावधानी ठेवली पाहिजे. ते हानी कारक असते.
9) समुद्रशास्त्र अनुसार मनगटावर तिळ असणे शुभ नसते. ज्याच्या हाताच्या मनगटावर तिळ आहे त्यांना जेलची यात्रा करावी लागते.
टीप: ह्या लेखात जी माहिती दिली आहे ती आम्ही फक्त आपल्यापर्यन्त पोचवत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.