किचन टिप्स: चहा बनवल्यावर आपण चहाची पत्ती नटाकून देता त्याचे आश्चर्यकारक फायदे
चहा बनवल्यावर आपण चहा पत्ती फेकून देतो. पण आपल्याला माहिती आहे का? ती चहा पत्ती फेकून न देता आपण ती परत वापरुन आपले किती तरी पैसे वाचवू शकतो. व त्याचे बरेच फायदेसुद्धा आहेत.
The text Amazing Kitchen Tips: How To Reuse Of Chai Patti At Home in Marathi be seen on our You tube Chanel How To Reuse Of Chai Patti At Home
प्रतेक घरात सकाळ संध्याकाळ चहा बनवला जातो. मग आपण चहा बनवून झाला की चहा पत्ती बेकार समजून फेकून देतो. पण ती आपल्या आरोग्याच्या बरोबर आपल्या घरात सुद्धा काही कामासाठी उपयोगी आहे.
आता आपण पाहू या की त्या चहाच्या पत्तीचा वापर आपण कसा करू शकतो.
चहा पत्तीचे फायदे:
1. चहाच्या पत्तीमध्ये एंटीऑक्सीडेंट असतात ते जखम भरून काढण्यास मदत करतात. चहा बनवून झाल्यावर राहिलेली चहा पत्ती धुवून मग पाण्यात उकळून घ्या मग जखमेवर लावून थोड्या वेळांनी जखम धुवून टाका.
2. चहा पत्तीने टैनिंग सुद्धा दूर होऊ शकते. त्यानी हाताचे कोपरे सुद्धा साफ होऊ शकतात. त्यासाठी चहा पत्ती धुवून घेऊन सुकवून वाटून घेऊन त्यामध्ये बेकिंग सोडा व थोडे पाणी मिक्स करून हाताच्या कोपऱ्यावर लाऊन घासून घ्या. त्यामुळे टैनिंग दूर होईल.
3. चहा पत्तीचे पाणी क्रोकरी साफ करण्यास मदत होते. जर तेलकट भांडी असतील व ती साफ करण्यास कठीण जात असेलतर चहा पत्तीच्या पाण्यात डिश वॉश मिक्स करून भांडी साफ करा.
4. चहा पत्ती परत पाण्यात टाकून गरम करून त्या पाण्यांनी तुपाचे किंवा तेलाचे डब्बे धुतले तर त्यालातेलकट किंवा तुपकट वास येत नाही.
5. आपण पाहतो की नेहमी किचनमध्ये माश्या भुणभुणताना दिसतात तर एका कापडाच्या पोटलीमध्ये चहाची पत्ती बांधून लटकवून ठेवा माश्या पळून जातील.
6. चहा बनवून झाल्यावर राहिलेली पत्ती सुकवून ठेवा मग जेव्हा आपण काबुली छोले बनवतो तेव्हा चहाची पोटली भाड्यात ठेवा त्यामुळे काबुली चण्याचा रंग छान येतो.
7. आपण घरात कुंडीमध्ये झाडे लावतो मग त्याला खत टाकावे लागते. तेव्हा चहाची पत्ती धुवून मग कुंडीतील झाडाला टाका. त्यामुळे झाडे छान राहतील.
8. राहिलेली चहा पत्ती वापरुन आपण केसांना नैसर्गिक कंडीशनर म्हणून वापरू शकतो. त्यासाठी राहिलेली चहा पत्ती धुवून परत उकळून घेऊन त्या पाण्यानी केस स्वच्छ करा. असे नेहमी केल्याने केस छान चमकदार होतील.
9. लाकूड वापरुन बनवलेले फर्निचर चहा पत्ती वापरुन चमकदार बनवू शकता. त्यासाठी राहिलेली चहा पत्ती परत पाण्यात उकळून मग काचेच्या बाटलीत किंवा स्प्रे च्या बाटलीत भरून त्यानी फर्निचर साफ करा छान चमक येईल.