कलौंजी म्हणजेच कांद्याचे बी डायबीटीस ते वेटलॉस साठी ५ अद्भुत फायदे
कलौंजीचे छोटे छोटे दाणे स्वाद व सेहदनी भरपूर मानले जातात. कलौंजीला मराठीत कांद्याचे बी व इंग्लिशमध्ये ब्लॅक सीड्स म्हणतात. कलौंजीचा उपयोग साधारणपणे लोणचे, मठरी व पुरी बनवण्यासाठी केला जातो. त्याच बरोबर अजून काही पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो.
The text Black Seed Benefits| Kalonji Health Benefits For Diabetes to Weight Loss in Marathi be seen on our You tube Chanel Black Seed Benefits| Kalonji Health Benefits For Diabetes to Weight Loss
कलौंजीमध्ये कैल्शियम, पोटैशियम, आयरन, मैग्नीशियम व जिंक ह्यासारखी पोषक तत्व आहेत. ते आपल्या शरीराला लाभदायक आहेत. कलौंजीच्या सेवनानी डायबीटीजच्या समस्या कंट्रोलमध्ये राहतात. चलातर मग आपण पाहू या कलौंजी सेवनाचे फायदे काय आहेत.
कलौंजीचे फायदे- Kalongi Ke Fayde:
१. शरीराचे वजन कमी करण्यासाठी फायदेमंद:
आजकाल शरीराचे वजन वाढले की बऱ्याच समस्याना सामोरे जावे लागते. मग आपण त्यासाठी वेगवेगळे उपाय करतो. त्यामधील एक उपाय म्हणजे कलौंजी होय. वजन कमी करण्यासाठी कलौंजीचा वापर करू शकतो. कलौंजीचे तेल, मध व गरम पाणी मिक्स करून सेवन केल्याने फैट अगदी फास्ट बर्न होण्यास मदत होते.
2. डायबिटीज असणाऱ्याना फायदेमंद:
डायबिटीज हा रोग आजकाल एक गंभीर समस्या होऊन बसला आहे. डायबिटीज आपण आपली लाईफस्टाइल व आपल्या आहारात बदल करून कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कलौंजीच्या तेल काळ्या चहात मिक्स करून सेवन केल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये येऊ शकतो.
३. हार्ट संबंधित समस्यामध्ये फायदेमंद:
हार्ट म्हणजे आपल्या शरीरातील महत्वपूर्ण हिस्सा आहे. हार्टला हेल्दी ठेवण्यासाठी आपले हेल्दी खाणे पिणे ठेवले पाहिजे. कलौंजीचे तेल गरम पाण्यात टाकून किंवा चहामध्ये टाकून सेवन केल्याने हार्ट हेल्दी राहू शकते.
४. थंडीमध्ये फायदेमंद:
सीझनमध्ये बदल झालाकी लगेच सर्दी-खोकला ह्या सारख्या समस्याना सामोरे जावे लागते. सर्दी झाल्यावर कलौंजीचे बी थोडे गरम करून त्याचा सुगंध घेतल्यास सर्दी -खोकला पासूनच्या समस्या पासून आराम मिळतो.
५. स्कीनसाठी फायदेमंद:
स्कीन संबंधित समस्यासाठी कलौंजीचे तेल वापरू शकता. कलौंजीचे तेल व लिंबूरस मिक्स करून स्कीनवर लावल्यास स्कीन सॉफ्ट राहते.
टीप: ह्या लेखात दिलेली माहीत आम्ही फक्त आपल्या माहितीसाठी देत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.