थंडगार स्वादिष्ट सेवई सेमिया फ्रूट कस्टर्ड उन्हाळा सीझन साठी
आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे. त्यामुळे सारखे काही तरी छान थंड खावे किंवा प्यावे वाटते. अशीच आज एक छान गोड थंडगार रेसिपी आपण पाहणार आहोत.
The Delicious Vermicelli Semiya Fruit Custard Dessert in Marathi be seen on our You tube Chanel Kitchen Hacks: Delicious Vermicelli Semiya Fruit Custard Dessert
आपण नेहमी शेवयाची खीर बनवतो. पण कधी शेवयाची खीर ही अश्या निराळ्या पद्धतीने बनवून पहा नक्की सगळ्यांना आवडेल. तर शेवयाची खीर बनवताना त्यामध्ये कस्टर्ड पावडर, ड्रायफ्रूट व फ्रूट अर्थात सीझनल फ्रूटस वापरुन आपण बनवू शकतो.
सेवई फ्रूट कस्टर्ड आपण जेवणानंतर डेझर्ट म्हणून बनवू शकतो किंवा कुणी पाहुणे येणार असतील तरी आपण बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1/2 लीटर क्रीम दूध
1/2 कप सेवया
1 टे स्पून तूप
1/2 कप साखर
2 टे स्पून कस्टर्ड पावडर
1/2 टी स्पून वेलची पावडर
1/4 कप ड्रायफ्रूट
1 टे स्पून टूटी फ्रूटी
सीझनल फ्रूट (चिरून)
कृती:
प्रथम दूध गरम करून घ्या. दुसऱ्या एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये सेवया थोड्या भाजून घ्या. मग त्यामध्ये हळू हळू दूध घालून शेवया शिजवून घ्या.
एका वाटीत किंवा बाउल मध्ये 1/2 कप दूध घेऊन त्यामध्ये कस्टर्ड पाउडर मिक्स करून मग शेवयाच्या दुधात घालून मिक्स करा हळू हळू मिश्रण घट्ट होऊ लागेल
मग त्यामध्ये साखर, वेलची पावडर, ड्राय फ्रूट घालून मिक्स करून 2-3 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या.
आता विस्तव बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर फ्रीजमध्ये 2 तास ठेवून बाउल मध्ये सर्व्ह करा.
सर्व्ह करताना वरतून ड्राय फ्रूट, टूटी फ्रूटी व फ्रेश फ्रूट घालून थंडगार सर्व्ह करा.