अयंगर बेकरी स्टाइल टूटी फ्रूटी केक बिना मैदा, आटा, ऑयल, बटर, अंडे व ओव्हन
अयंगर बेकरी स्टाइल टूटी फ्रूटी केक बनवणे अगदी सोपे आहे. व त्याची एक खास बात अशी आहे की आपण त्यामध्ये मैदा किंवा आटा वापरणार नाही त्यामुळे तो केक अगदी खूप पौष्टिक आहे. त्याच बरोबर त्यामध्ये तेल किंवा बटर पण वापरायचे नाही. मग तुम्ही म्हणताल की मग केक मऊ कसा बनवायचा तर त्याचे एक सीक्रेट आहे. त्याच बरोबर त्यामध्ये अंडी सुद्धा नाही वापरायची म्हणजे अगदी प्यूयर व्हेज कोणी सुद्धा खाऊ शकते. तसेच ओव्हन सुद्धा पाहिजे असे सुद्धा नाही.
The text Iyengar bakery Style Cake No Maida Atta Oil Butter Egg Or Oven in Marathi be seen on our You tube Chanel Iyengar bakery Style tutti frutti Cake
टूटी फ्रूटी केक खूप छान टेस्टी लागतो. दिसायला सुद्धा आकर्षक दिसतो. आपण घरी मुलांच्या वाढदिवसाला किंवा डेझर्ट महणून सुद्धा बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
बेकिंग वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ७-८ जणांसाठी
साहित्य:
१ १/२ कप रवा (बारीक)
३/४ कप पिठीसाखर (+ २ टे स्पून)
१/२ कप फ्रेश मलाई
१/२ कप दही
३/४ कप दूध
१ टी स्पून बेकिंग पाउडर
१/२ टी स्पून बेकिंग सोडा
३ टे स्पून टूटी फ्रूटी
१/२ टी स्पून व्हनीला एसेन्स
कृती:
प्रथम बारीक रवा घ्या. जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सर मध्ये थोडा ग्राइंड करून घ्या. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. केकच्या भांड्याला तेल लाऊन बटर पेपर घाला व बाजूला ठेवा.
नॉन स्टिक पॅनमध्ये बारीक मीठ घालून झाकण ठेवून १५-२० मिनिट मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. आतमध्ये एक छोटा स्टँड ठेवा.
एका बाउलमध्ये फ्रेश मलाई घ्या. (मलई म्हणजे आपण रोज दुधा वरची साय काढतो ती) जर मलई नसेलतर अमूल फ्रेश क्रीम घेतले तरी चालेल. क्रीम घेऊन ते एग बिटरनि किंवा चमच्यानि छान एक सारखे मऊ करून घ्या.
मग त्यामध्ये पिठीसाखर घालून २-३ मिनिट फेटून घ्या. आता त्यामध्ये दही घालून मिक्स करून रवा घालून मिश्रण मिक्स करून घ्या. १/२ कप दूध घालून मिश्रम सारखे करून झाकून १०-१५ मिनिट बाजूला ठेवा.
आता झाकण काढून पाहिले तर रवा छान फुलला असेल मिश्रणामध्ये बाकीचे दूध, निम्मी टूटी फ्रूटी, व्हनीला एसेन्स घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये बेकिंग पाउडर व बेकिंग सोडा घालून हळुवार पणे मिक्स करा.
मिश्रण तेल लावलेल्या केक च्या भांड्यात ओता एकदा हळूच आपटा म्हणजे मिश्रणा मध्ये जर हवा असलेतर निघून जाईल. वरतून बाकीची राहिलेली टूटी फ्रूटी घालून भांडे पॅन मध्ये ठेवा. भांडे ठेवून झाकण ठेवा व ४५ मिनिट मंद विस्तवावर केक बेक करून घ्या. ४५ मिनिट झाल्यावर सुरीने चेक करा केक झाला का जर सुरीला मिश्रण चटकले तर अजून ५-७ मिनिट बेक करा.
मग विस्तव बंद करून पॅन तसाच ठेवा ५ मिनिट झाल्यावर झाकण काढून केक बाहेर काढून थंड करायला ठेवा. केक थंड झाल्यावर प्लेट मध्ये काढून बटर पेपर काढून कापून सर्व्ह करा.