किचन टिप्स: उन्हाळ्यात हिरव्या मिरच्या लवकर खराब होतात जास्त दिवस कश्या साठवून ठेवायच्या सोपी पद्धत
उन्हाळा आला की हिरव्या मिरच्या लवकर खराब होतात मग त्या जास्त दिवस कश्या साठवून ठेवायच्या त्याच्या काही ट्रिक्स आहेत त्याजर आपण आचरणात आणल्या तर आपण जास्त दिवस छान ताज्या हिरव्या गार म्हणजेच 15-20 दिवस ठेवू शकतो. त्या आजिबात खराब होणार नाहीत.
The text Kitchen Hacks: How To Store Green Chilli For Long Time In Summer Season in Marathi be seen on our You tube Chanel Kitchen Hacks: How To Store Green Chilli For Long Time In Summer Season
हिरव्या मिरच्या आपल्याला रोज स्वयंपाक करताना लागतात त्याजर छान ताज्या असतील तर स्वयंपाक करताना छान वाटते. आपण जास्त मिरच्या आणून ठेवल्यातर त्या लाल सुद्धा होतात. किंवा खराब होतात आता गरमीचा सीझन येत आहे त्यासाठी ही एक छान उपयुक्त टीप आहे.
हिरवी मिरची जास्त दिवस टिकण्यासाठी टिप्स:
1. पहिली पद्धत:
1. हिरव्या मिरच्या सर्व प्रथम स्वच्छ पाण्यानी धुवून घ्या. मग थंड पाण्यात 15-20 मिनिट तशीच ठेवा. मग पाण्यातून काढून चाळणीत ठेवा.
2. पाणी सुकल्यावर त्याचे देठ काढून टाका.
3. खराब झालेल्या मिरच्या काढून टाका.
4. आता सर्व मिरच्या पेपर टॉवेलवर सुकवून घ्या.
5. मग पेपर न्यपकिन मध्ये गुंडाळून जीप लॉक बॅगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. पण फ्रीजमध्ये ठेवताना अश्या ठिकाणी ठेवा की त्या जागी डायरेक्ट थंड हवा येणार नाही.
6. हिरव्या मिरच्या आपण हवाबंद डब्यात पेपर लाऊन सुद्धा ठेवू शकतो.
7. अश्या प्रकारे आपण हिरव्या मिरच्या 15 दिवसतरी छान ताज्या ठेवू शकतो.
2. दुसरी पद्धत:
1. हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्यानी धुवून पेपरवर थोडावेळ ठेवा.
2. मग त्या कोरड्या झाल्यावर त्याची देठ काढून टाका.
3. मिरच्या स्वच्छ न्यापकिननी पुसून घ्या. मग मिक्सरमद्धे ब्लेंड करून घेऊन स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत पेस्ट बनवून ठेवा.
4. किंवा एक ट्रेमध्ये पेस्टचे छोटे छोटे गोळे टाकून डीप फ्रीजमध्ये 2-3 तास ठेवून मग काढून डब्यात भरून परत डीप फ्रीजमध्ये ठेवा. .
5. मग लागेलतसे गोळे काढून वापरा.