५ फेब्रुवारी माघ पूर्णिमा करा ५ काम लक्ष्मी-नारायण करतील सर्व मनोकामना पूर्ण
माघ पूर्णिमा ५ फेब्रुवारी २०२३ रविवार ह्या दिवशी आहे. पूर्णिमा ह्या तिथीचे स्वामी चंद्र देवता आहेत. असे म्हणतात की पूर्णिमा ह्या दिवशी ह्यांची पूजा केल्यास मनुष्यच्या संसारातील अडचणी दूर होतील. खास करून आपल्या मुलं-बाळांचे स्वास्थ उत्तम रहावे म्हणून ह्या दिवशी उपवास करणे महत्व पूर्ण मानले जाते.
असे म्हणतात की जी मुले नेहमी सर्दी-खोकला, निमोनिया इ. रोगांपासून त्रस्त असतात अश्या मुलांच्या मातानी संपूर्ण वर्ष पूर्णिमा ह्या दिवशी उपवास करावा. त्याच्या मुळे मुलांना लाभ होतो.
The text Magh Purnima 2023 Shubh Muhurat w Upay in Marathi be seen on our You tube Chanel Magh Purnima 2023 Shubh Muhurat w Upay
माघ पूर्णिमा ह्या दिवशी काही खास काम केलेतर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते. चला तर मग पाहूया माघ पूर्णिमा या दिवसाचा मुहूर्त, शुभ योग व उपाय
माघ पूर्णिमा 2023 पूजा मुहूर्त (Magh Purnima 2023 Muhurat)
पंचांग नुसार माघ महिन्याची पूर्णिमा तिथी सुरुवात ४ फेब्रुवारी २०२३ रात्री ९ वाजून २१ मिनिट पासून ते ६ फेब्रुवारी २०२३ रात्री ११ वाजून ५८ मिनिट पर्यन्त आहे.
माघ पूर्णिमा ह्या दिवशी गंगास्नान शुभ मुहूर्त सकाळी ५ वाजून २७ मिनिट पासून सकाळी ६ वाजून १८ मिनिट पर्यन्त आहे.
ह्या वर्षी माघ पूर्णिमा ह्या दिवशी पुष्य व अश्लेषा नक्षत्र असून त्याच बरोबर सर्वार्थ सिद्धि योग, आयुष्मान व सौभाग्य योग आहे. त्याच बरोबर ह्या वर्षी माघ पूर्णिमा ह्या दिवशी काही खास जीवनामध्ये भाग्योदय होऊ शकतो.
माघ पूर्णिमा ह्या दिवशी करा हे ५ उपाय: (Magh Purnima Upay)
१) सूर्योदयच्या पूर्व स्नान करा:
माघ पूर्णिमा ह्या दिवशी संगम घाटावर स्नान करण्याचे खास महत्व आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी गंगा स्नान केल्यास शरीरामद्धे अमृत समान गुण येतात जर गंगा स्नान करणे संभव नसेलतर घरीच स्नान करण्याच्या पाण्यात पवित्र नदीचे थोडेसे पाणी मिक्स करून ब्रह्म मुहूर्तवर स्नान करावे त्यामुळे व्यक्तिच्या मागील जन्माचे पाप धुतले जाते. पाण्यात थोडेसे दूध मिक्स करून स्नान करावे त्यामुळे चंद्र दोष दूर होईल.
२. सत्यनारायण पूजा केल्याने येईल संपन्नता:
माघ पूर्णिमा ह्या दिवशी संपूर्ण दिवस तुपाचा दिवा लावावा मग सत्यनारायण पूजा केल्याने घरात माता लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. आर्थिक संपन्नता मध्ये वृद्धि होते. कथा वाचून झाल्यावर ब्राह्मण ला भोजन द्यावे. पूजा झाल्यावर दान केल्याने घरात सुख शांती राहते व वैवाहिक जीवना मधील परेशानी दूर होतात.
३. चंद्राची पूजा केल्यास आपल्या करियरमध्ये खूप सुधार होईल:
धार्मिक मान्यता अनुसार माघ पूर्णिमाच्या रात्री चंद्राला अर्घ्य देवून प्रणाम करून थोडेसे तांदूळ धन स्थानावर ठेवा. त्यामुळे व्यक्तिच्या करियरमध्ये खूप सुधार होईल. ज्या लोकांची बौद्धिक क्षमता कमी आहे त्यांनी रात्री चंद्राच्या प्रकाशात चंद्राला ५ मिनिट शांत पणे पहावे. असे म्हणतात की पूर्णिमा ह्या दिवशी चंद्र १६ कालांनी पूर्ण असतो. हा उपाय केल्याने व्यक्तीची स्मरण शक्ति वाढते व बुद्धीचा विकास होतो.
४. माघ पूर्णिमा ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे महत्व आहे. पिंपळाचे झाड विष्णु भगवान ह्यांना प्रिय आहे ह्या दिवशी दूध व पाणी मिक्स करून अर्पण करा. तुपाचा दिवा लावावा त्यामुळे भगवान विष्णु आपल्याला आशीर्वाद देतात.
५. रवि पुष्य योग आहे त्यामुळे सोने खरेदी करून माता लक्ष्मीला अर्पित कारा त्यामुळे धनामध्ये वाढ होईल. भगवान कृष्ण ह्यांची पूजा करून त्यांना लड्डूचा नेवेद्य दाखवा.
Disclaimer: ही माहिती आम्ही फक्त आपल्या पर्यन्त पोचवत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.