महाशिवरात्रीच्या दिवशी करा ही उपाय सर्व मनोकामना शिवजी पूर्ण करतील
हिंदू पंचांगनुसार १८ फेब्रुवारी २०२३ शनिवार ह्या दिवशी महाशिवरात्री हा अत्यंत पावन सण साजरा करायचा आहे. असे ,म्हणतात की ह्या दिवशी भगवान शंकर ह्यांनी वैराग्य जीवन सोडून गृहस्थ जीवनमध्ये प्रवेश केला होता. म्हणजेच महाशिवरात्री ह्या दिवशी भगवान शंकर व माता पार्वती ह्यांचा विवाह संपन्न झाला होता.
The text Mahashivratri 2023 Kara He Upay Sarv Manokamna Purn Hotil in Marathi be seen on our You tube Chanel Mahashivratri 2023 Kara He Upay Sarv Manokamna Purn Hotil
पंचांगनुसार महाशिवरात्री १८ फेब्रुवारी २०२३ शनिवार ह्या दिवशी आहे.
१७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रात्री ८ वाजून २ मिनिट पासून सुरुवात
१८ फेब्रुवारी २०२३ शनिवार संध्याकाळी ४ वाजून १८ मिनिट पर्यन्त
महाशिवरात्री ह्या दिवशी करावयाचे उपाय:
१. नोकरीमधील परेशानी दूर करण्यासाठी:
महाशिवरात्री ह्या दिवशी शिवलिंगवर दूध, दही, तूप, मध व साखर मिक्स करून त्याचे पंचामृत बनवून त्याने अभिषेक करून १०८ वेळा “ॐ नम: शिवाय” ह्या मंत्राचा जाप करावा. असे केल्याने नोकरी संबंधित परेशानी दूर होऊन चांगली नोकरी मिळू शकेल किंवा त्याच नोकरीमध्ये वरचा हुद्दा मिळू शकेल.
२. वैवाहिक जीवनातील परेशानी दूर करण्यासाठी:
वैवाहिक जीवनातील परेशानी दूर करण्यासाठी सौभाग्यवती महिलांनी सौभाग्याची सामग्री म्हणजे बांगड्या, बिंदी, सिंदूर, साडी कोणलातरी भेट म्हणून द्यावी. असे केल्याने वैवाहिक जीवनातील परेशानी दूर होतील.
३. संतान प्राप्तीसाठी:
संतान प्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी पती-पत्नी दोघांनी मिळून पूजा अर्चा केली पाहिजे. सर्वात पहिल्यांदा गाईच्या शुद्ध तुपानी शिवलिंगवर अभिषेक करावा. मग शुद्ध पाण्यानी अभिषेक करून ११ बेलपत्रवर राम राम असे लिहून शिवलिंगवर अर्पित करावे. मग संतती प्राप्तीसाठी भोलेनाथ प्रार्थना करावी. शंकर भगवान आपली मनोकामना लवकर पूर्ण करील.
टीप: ह्या लेखात दिलेली माहिती फक्त आपल्या माहितीसाठी देत आहोत त्यांची कोणतीसुद्धा हमी आम्ही घेत नाही.