वास्तु टिप्स: घरात धनवृद्धी साठी ५ सोपे सटीक उपाय
आपल्या जीवनात धन-धान्य, सुख-समृद्धी प्रतेकाला पाहिजे असते. पण बरेच लोक खूप मेहनत करून सुद्धा परेशान असतात की त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. किंवा पैसा खूप येतो पण तो हातात टिकत नाही. त्यामुळे परिवारात आर्थिक परेशानी बरोबरच अजून काही परेशानीचा सामना करावा लागतो.
The text Vastu Tips: Best Tips For Money & Prosperity in Marathi be seen on our You tube Chanel Vastu Tips: Best Tips For Money & Prosperity
आपल्याला जास्तीत जास्त धन कमवायचे असेलतर आपल्याला वास्तु टिप्स आचरणात आणायला पाहिजे.
वास्तु शास्त्रामध्ये धन वृद्धीचे अनेक उपाय सांगितले आहेत. ते उपाय केलेतर आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. वास्तु विशेषतज्ञ सुद्धा म्हणतात की ज्या व्यक्तिच्या जीवनात नेहमी आर्थिक परेशानी असतील तर त्यांनी धन वृद्धी होण्या साठी घरात व घराच्या आसपास काही गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणजेच धन वृद्धी होण्यासाठी काही सोपे व सटीक उपाय केले पाहिजेत.
चला तर मग पाहू या की घरात धन वृद्धी होण्याचे कोणते उपाय आहेत:
१. तिजोरीचे तोंड ह्या दिशेला ठेवा:
वास्तु शास्त्रा नुसार घरात तिजोरीचे तोंड नेहमी उत्तर-पूर्व ह्या दिशेला ठेवले पाहिजे. असे केल्याने धनाची कमतरता होत नाही. असे म्हणतात की त्यामुळे धन व दाग दागिनेनि तिजोरी नेहमी भरलेली राहते. जे आपली तिजोरी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असलेतर धनाच्या हानीला सामोरे जावे लागते.
२. घराचा मुख्य दरवाजाचा उपाय:
वास्तु शास्त्रा नुसार घराच्या मुख्य दरवाजातून घरात नेहमी सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा येत असते. म्हणून घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढावे. स्वस्तिक चिन्ह काढताना अष्टगंधचा वापर करावा. त्यामुळे घरात धनाची कमी कधी सुद्धा होत नाही.
३. मुख्य दारवाजाची पूजा:
घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा तसेच घराच्या समोरील जागा सुद्धा स्वच्छ ठेवावी. रांगोळी काढावी त्यावर हळद-कुंकू घालावे त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही किंवा लोकांची वाईट नजर येत नाही. शक्य असेलर संध्याकाळी अगरबत्ती व दिवा लावावा. लावावी.
४. घरात ७ घोड्यांची फ्रेम लावा:
शास्त्रा नुसार एक रथाला ७ घोडे बांधलेले म्हणजे सूर्य देवाचे वाहन समजले जाते. अशी फ्रेम पूर्व दिशेला लावल्याने उन्नती होते व घरात सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो.
५. घरात भिंतीवर निरनिराळ्या फ्रेम लावा:
घरात सुंदर फ्रेमस लावल्यातर घराची सुंदरता वाढून धन दौलतमध्ये वृद्धी होते. घरात दक्षिण व पूर्व दिशेला चांगल्या नैसर्गिक सौन्दर्यच्या फ्रेम लावल्यातर आनंदी वातावरण राहून धनाची वृद्धी होते.
डिस्क्लेमर
आम्ही ही माहिती फक्त आपल्या पर्यन्त पोचवण्यासाठी देत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.