20 अमेझिंग टिप्स व ट्रिक्स बिगिनर्ससाठी
प्रतेक व्यक्तीच्या जीवनात परेशानी असतात. बरेच वेळ आपल्याला माहिती नसते की छोटे छोटे प्रॉब्लेम कसे सोडवायचे त्यासाठी काही घरगुती टिप्स व ट्रिक्स आहेत त्या आचरणात आणून आपण आपले काही प्रॉब्लेम मिनिटांत सोडवू शकतो.
The text Amazing Tips And Tricks For Beginners in Marathi be seen on our You tube Chanel Amazing Tips And Tricks For Beginners
20 सोप्या व सहज आचरणात आणता येतील अश्या टिप्स व ट्रिक्स आहेत.
1. कांद्याची पेस्ट बनवताना त्यामध्ये थोडे किसलेले पनीर घातले तर त्याचा स्वाद खूप छान येतो.
2.दाल मोठ बनवताना आपण डाळ भिजवतो तेव्हा थोडेसे दूध घाला त्यामुळे डाळ छान फुलेल व मस्त खुसखुशीत होईल.
3.कपड्यावर शाईचा डाग पडला तर डागाच्या दोन्ही बाजूनी पेस्ट लावा मग थोडा वेळांनी धुवून टाका.
4.मुंग्याना पळवून लावण्यासाठी मुंग्याच्या बाजूनी थोडेसे सरसुचे तेल टाका. मुंग्या निघून जातील मग कापूर नी बाजूनी रेघा मारा. कपाटात कपूरच्या वड्या ठेवल्यातर मुंग्या येत नाहीत.
5.घरात रंग काम चालू करणार असालतर ज्या खोलीत रंग मारायचा आहे त्या खोलीत फरशीवर रॉकेलनी पुसून घ्या म्हणजे रंगांचे दाग पडलेतर लगेच निघतील्.
6.जळत असलेली मेणबत्ती थोड्याच्या पाण्यात ठेवा बराच जळत रहाते.
7.पांढरे कपडे धुवून झाल्यावर तुरटीच्या पाण्यात परत एकदा धुवा म्हणजे छान पांढरे व चमकदार होतील.
8.फरशीवर नेलपेंट चे दाग पडले तर त्यावर थोडासा परफुम् मारा दाग निघून जातील.
9.आपण पत्ते खेळतो ते जर एकमेकाला चिटकले असतील तर त्यावर टालकम पावडर टाका .
10.दार खिडक्या पेंट करताना काचेवर दाग पडतात तर कागद ओला करून काचेवर चिटकवा पेंट झाल्यावर काढून टाका.
11.वापरलेली बॅटरीची निगेटिव्ह बाजू पेटत्या मेणबत्तीच्या टोकावर 5 मिनिट धरल्यास बॅटरी परत चालू शकते.
12.एरंडेल तेल नाभी मध्ये सारखे सारखे सोडल्यास प्रसूती लवकर होऊ शकते.
13.प्रसूती होण्याच्या आठ दिवस अगोदर गरोदर महिलेने रोज अंजीर सेवन केले पाहिजेत.
14.केसर मधमध्ये मिक्स करून डोळ्याना लावल्यास नेत्र रोग निघून जातात.
15.इलेक्ट्रिक बोर्ड जर खराब झाला तर नेलपेंट रिमूव्हर किंवा रॉकेलनी स्वच्छ करा.
16.बुटाचे पॉलिश जर सुकले असेलतर त्यामध्ये जवसच्या तेलाचे 2-3 थेंब घाला रात्रभर तसेच ठेवा सकाळी अगदी नव्या सारखे होईल.
17.चांदीची भांडी किंवा दागिने कोलगेट पावडरनी साफ केल्यास चमकदार बनतात.
18.कपड्यावर बॉलपेनचे दाग पडले तर दूध व पाणी मिक्स करून लाऊन घासून काढावे मग कपडा धुवावा.
19.सुकलेल्या संत्रची साल टाकून न देता ती उकल्यात पाण्यात टाकून मग ते पाणी अंघोळीच्या पाण्यात टाकल्यास शरीराला चांगला सुगंध येतो.
20.साखरेच्या डब्यात मुंग्या झाल्यातर त्यामध्ये कपूरची वडी कागदात गुंडाळून ठेवा किंवा 2-3 लवंग ठेवा मुंग्या निघून जातील.