चैत्र नवरात्री 2023 पूजाविधी, मुहूर्त, देवीची 9 रूप कोणत्या दिवशी कोणत्या रूपाची पूजा करायची
चैत्र नवरात्री ह्या वर्षी 22 मार्च 2023 पासून सुरू होत असून 30 मार्च रोजी समाप्त होत आहे. नवरात्री मध्ये रोज नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा अर्चा केली जाते. ह्या वर्षी 110 वर्षा नंतर दुर्लभ संयोग निर्माण होत आहे. ह्या वर्षी दुर्गा माता नावेत बसून येत आहे. असे म्हणतात की दुर्गा माता नावेत बसून येत आहे त्यामुळे ह्या वर्षी पावसाचे प्रमाण भरपूर आहे.
The text Chaitra Navratri 2023 Sampurn Mahiti in Marathi be seen on our You tube Chanel Chaitra Navratri 2023 Sampurn Mahit
हिंदू पंचांग नुसार दर वर्षी 4 नवरात्री साजऱ्या केल्या जातात. शक्तिची पूजाचा महापर्व नवरात्री चैत्र शुक्ल प्रतिपदा पासून सुरू होत आहे. ह्यावर्षी नवरात्रीमध्ये 4 विशेष संयोग येत आहेत. तसेच ह्या वर्षी 9 दिवस पूर्ण नवरात्री असून माताचे आगमन नावेत बसून होत असून प्रस्तान डोली मध्ये होत आहे ते खूप शुभ मानले जाते.
चैत्र नवरात्री 2023 शुभ मुहूर्त:
चैत्र नवरात्री मध्ये ह्या वर्षी विशेष महासंयोग येत आहे.
प्रतिपदा तिथी: 21 मार्च रात्री 11 वाजून 4 मिनिट
नवरात्री आरंभ: 22 मार्च सुर्योदयच्या वेळी कलश स्थापना होईल.
चैत्र नवरात्री नावेत होणार आहे त्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते. ह्या वर्षी नव संवस्तर लागणार आहे. ह्या दिवशी भगवान ब्रह्मा ह्यांनी पृथ्वीची रचना केली होती म्हणून हा दिवस खूप महत्वपूर्ण आहे. हाय वर्षी राजा बुद्ध व मंत्री शुक्र ग्रह आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात बरीच क्रांति होणार आहे. महिलांसाठी हे वर्ष खूप छान आहे.
चैत्र नवरात्री 2023 पूजाविधी:
कलश स्थापना विधी सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. जेथे पूजा करायची आहे ती जागा साफ करून लाल रंगाचे कापड आंथरून त्यावर माता राणीची प्रतिमा स्थापित करा. त्यावर थोड्या अक्षता ठेवा म्हणजे तांदूळ ठेवा. मग एका मातीच्या भांड्यात जवस किंवा गहू व माती एकत्र करून पसरवून ठेवा मग त्यावर कलश ठेवा, कलशावर स्वस्तिकचे चिन्ह काढून कलशाला कलवा बांधा.
कलशमध्ये सुपारी, कॉईन, फूल व अक्षता टाकून अशोकाची पाने ठेवा किंवा पांच प्रकारची पान ठेवा, कलाशवर एक छोटी थाली ठेवून त्यामध्ये तांदूळ भरून ठेवा, त्यावर एक नारळ लाल कापडात गुंडाळून रक्षा सूत्रनी बांध म्हणजेच लाल रंगाच्या कलवा नी बाधा.
मग कलशाला हळद कुंकू लावा, अक्षता, फूल अर्पित करा. नेवेद्य दाखवा व फळ व मिठाई दाखवा. मग रोज कलशच्या बाजूनी पाणी शिंपडा दोन दिवसांत तुम्हाला अंकुर फुटलेले दिसतील.
माता दुर्गाची 9 रूप कोणत्या दिवशी कोणत्या रूपाची पूजा करायची
1. नवरात्री पहिला दिवस 22 मार्च 2023 बुधवार माता शैलपुत्री पूजा (घटस्थापना)
2. दूसरा दिवस 23 मार्च गुरुवार माता ब्रह्मचारिणी पूजा
3. तिसरा दिवस 24 मार्च शुक्रवार माता चंद्रघंटा पूजा
4. चौथा दिवस 25 मार्च शनिवार माता कूष्माण्डा पूजा
5. पांचवा दिवस 26 मार्च रविवार स्कंदमाता पूजा
6. सहावा दिवस 27 मार्च सोमवार कांत्यायनी पूजा
7. सतवा दिवस 28 मार्च मंगळवार कालरात्री पूजा
8. आठवा दिवस 29 मार्च बुधवार माता महागौरी पूजा
9. नववा दिवस 30 मार्च गुरुवार सिद्धिदात्री पूजा