दूध उकळून उतू जाणे शुभ का अशुभ
ज्योतिष शास्त्रा नुसार दूध ह्या वर चंद्राचा अधिकार असतो. चंद्र हा ग्रह व्यक्तीचे मन, परिवार संबंध, पैसे, माता, गृहस्थी, सुख व शांतीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच शुभ कामाची सुरवात प्रतेक घरात दुधाचा प्रयोग करूनच होते. पण बरेच वेळा काही लोक दूधला उकळी येऊन उतू गेलेतर लोक दुखी होतात व काही जण दूध उतू जाणे म्हणजे अपशकुन झाला म्हणून परेशान होतात.
The text Dudh Utu Jane Shubh Ki Ashubh in Marathi be seen on our You tube Chanel Dudh Utu Jane Shubh Ki Ashubh
चला तर मग आपण पाहूया दूध उतू जाण्या संबंधित काय शकुन आहेत.
1. सकाळी सकाळी दूध दिसलेतर:
जर आपल्याला सकाळच्या वेळी कोणी व्यक्ति दूध खरेदी करताना दिसले किंवा दूध पिताना दिसले तर तो शुभ शकुन मानला जातो.
2. जर दूधला उकळी येऊन उतू गेलेतर:
जर दुधाच्या भांड्यातून दूध खाली पडलेतर घरात सुख-शांती, संपत्ति, मान व वैभवाचे संकेत आहेत. असे झालेतर आपण परेशान होऊ नये उलट खुश व्हावे.
3. दूध सांडलेतर:
जर दूध भांड्यात किंवा कपात असेल व ते सांडले तर अपशकुन मानले जाते, असे म्हणतात की दुर्घटनाचे संकेत आहेत.
4. मुदामून दूध सांडवलेतर:
जर कोणी व्यक्तिनि मुदामून दूध सांडले किंवा दूध पिताना ग्लास पडला तर ते चांगले संकेत मानले जात नाही. असे म्हणतात की होणाऱ्या दुर्घटनेचा तो इशारा आहे. किंवा घरातील होणाऱ्या कलहाचे कारण आहे.
5. अचानक दूध नासणे:
जर घरातील दूध कोणत्यासुद्धा कारणा शिवाय नासणे म्हणजे शुभ संकेत नाहीत.
6. वास्तु शास्त्रा नुसार घरात रोज दूध उतू जाणे चांगले नाही त्यामुळे माता अन्नपूर्णा नाराज होते.