Gudi Padwa 2023 Muhurat, Mahatva v Gudi Kashi Ubhi Karaychi W Puja Vidhi In Marathi

Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2023 Muhurat, Mahatva v Gudi Kashi Ubhi Karaychi W Puja Vidhi

गुडी (गुढी) पाडवा 2023 मुहूर्त, महत्व व गुडी कशी उभारायची व पूजाविधी 

गुडी पाडवा ह्या सणापासून हिंदू लोकांचे नवीन वर्ष चालू होते. फाल्गुन महिना संपला की चैत्र महिना नवीन वर्षातील पहिला महिना आहे. महाराष्ट्रमध्ये गुडी पाडवा म्हणून साजरा करतात तर कर्नाटक मध्ये युगादी , आंध्र व तेलंगणा मध्ये उगादि, काश्मीर मध्ये नवरेह, मणिपूर मध्ये सजीबु नोंगमा पानबा , सिंध मध्ये चेती चंड, गोवा व केरळ मध्ये संवत्सर पाडवा ह्या नावाने हा सण साजरा करतात.

The text Gudi Padwa 2023 Muhurat, Mahatva v Gudi Kashi Ubhi Karaychi W Puja Vidhi in Marathi be seen on our You tube Chanel Gudi Padwa 2023 Muhurat, Mahatva v Puja Vidhi

गुडी पाडवा चैत्र प्रतिपदा 22 मार्च 2023 बुधवार ह्या दिवशी आहे. ह्याच दिवशी चैत्र नवरात्री सुद्धा सुरू होत आहे.

महाराष्ट्र मध्ये गुडी पाडवा अगदी जोरात साजरा करतात. गुडीपाडवा ह्या दिवशी महिला आपले घर सुंदर आवरून घरा समोर सडा रांगोळी काढतात. घरच्या मुख्य दरवाजावर आंब्याचे तोरण बांधतात व फुले लावतात. गुडी पाडवाची सुरवात सकाळी पहाटे पासूनच सुरू होते. घरातील सदस्य सकाळी लवकर उठून शरीराला तेल लाऊन आंघोळ करतात.

गुडी पाडवा साजरा करण्यामागे बऱ्याच मान्यता आहेत. असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान ब्रम्हा ह्यांनी सृष्टिची रचना केली त्याच बरोबर असे म्हणतात की ह्या दिवसा पासून सतयुग सुरू झाले. म्हणून ह्या दिवशी पूजा अर्चा करण्याचे महत्व अधिक आहे. तसेच प्राचीन काळा नुसार प्रभु श्रीराम ह्यांनी बळीचा वध करून दक्षिण भारत मधील जनतेला त्याच्या त्रासा पासून मुक्त केले होते. चला तर मग आपण पाहू या गुडी पाडवाचे महत्व काय आहे.

Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2023 Muhurat, Mahatva v Gudi Kashi Ubhi Karaychi W Puja Vidhi

गुड़ी पाडवा 2023 तिथि व मुहूर्त:
पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10 वाजून 52 मिनिट पासून सुरू होणार आणि दुसऱ्या दिवशी 22 मार्च 2023 रोजी रात्री 8 वाजून 20 मिनिटाला समाप्त होणार.

उदयतिथीनुसार गुढीपाडवा 22 मार्च 2023 बुधवार रोजी आहे. पूजा मुहूर्त 22 मार्च 2023 रोजी सकाळी 6 वाजून 29 मिनिट ते सकाळी 7 वाजून 39 मिनिट पर्यंत आहे.

गुढी पाडवा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो. हिंदू पंचांग नुसार साडेतीन मुहूर्त मानले जातात त्यामध्ये गुडी पाडवा, अक्षय तृतीया, दसरा व दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. गुढी पाडवा हा दिवस पूर्ण दिवस शुभ असल्यामुळे ह्या दिवशी गृह प्रवेश करतात किंवा नवीन काम धंदा सुरू करतात किंवा नवीन वस्तु खरेदी करतात किंवा ह्या दिवशी सोने सुद्धा खरेदी करतात त्यामुळे आपल्या घरात बरकत भरभराट होते.

गुढी पाडवा महत्व:
महाराष्ट्रमध्ये गुडीपाडवा हा सण खूप श्रद्धा पूर्वक साजरा केला जातो हिंदू मराठी कॅलेंडर नुसार ह्या दिवसा पासून नवीन वर्ष सुरू होते. भारतात प्रतेक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे गुढी पाडवा हा सण साजरा केला जातो.

महाराष्टमध्ये प्रतेक घरात दारासमोर सुंदर गुडी उभारून त्याची पूजा करून हा सण साजरा केला जातो. असे म्हणतात की गुडी उभारून त्याचे पूजन केल्यास घरात सुख समृद्धी येते व घरातील नकारात्मक शक्ति निघून सकारात्मक ऊर्जा घरात येते.

गुढी पाडवा ह्या दिवशी गुडी उभरतान कडीलिंबूची पाने लावतात व ह्या दिवशी कडीलिंबाची पाने व चिंच ह्याची चटणी सेवन सुद्धा करतात त्याच्या मुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते. तसेच रोग प्रतिकार शक्ति वाढते व आपले शरीर आतून मजबूत बनते.

प्राचीन काळा पासून असे म्हणतात की वीर मराठा छत्रपति शिवाजी महाराज हयाणी युद्ध जिकल्यावर सर्वात पहिल्यांदा गुडी उभारून हा सण साजरा केला होता. मग मराठी लोकांनी प्रतेक वर्षी गुडी उभारन्यास सुरवात केली. म्हणजेच गुडी उभारून विजय पताकाचे रूप मानून हा सण साजरा करतात.

गुडी पाडवा ह्या दिवशी गुडी कशी उभी करायची:
* गुडी उभी करण्यासाठी एक लाकडी दांडा घ्या.
* दांडा साफ करून स्वच्छ धुवून घेऊन त्यावर एक रेशीम साडी आपण जश्या निऱ्या घालतो तश्या घालायच्या व दांडा वर बंधायच्या
* साडीवर एक कडीलिंबाची डहाळी, आंब्याची पांच पाने, फुलांचा हार, गाठीची माळ लावायची म त्यावर एक तांब्याचा गडू किंवा चांदीचा लोटा ठेवायचा.
* जय जागी आपण गुडी बांधणार आहोत ती जागा स्वच्छ करून तेथे सडा रांगोळी काढा. मग तेथे एक पाट ठेवून त्यावर तो दांडा ठेवावा. म्हणजे बांधावा.
* आपण ही गुडी आपल्या मुख्य दरवाजा जवळ बांधू शकतो किंवा टेरेसवर किंवा ग्यालरी मध्ये सुद्धा बांधू शकतो.
* मग गुडीची पूजा करून हळद-कुंकू, फूल व आगरबती लाऊन तुपाचा दिवा लाऊन पूजा करावी मग दूध-साखर, पेढे चा प्रसाद दाखवावा.
* दुपारी गोडचा नेवेद्य दाखवावा. ह्या दिवशी श्रीखंड पुरी किंवा पुरण पोळीचा नेवेद्य दाखवतात.
* संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर हळद-कुंकू अक्षता अर्पित करून गुडी उतरवतात.
* गुडी पाडवा ह्या दिवशी एकमेकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देतात.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.