होळी 2023:होळीच्या दिवशी ग्रहदोष मुक्ती व आर्थिक उन्नतीसाठी करा हे सटीक उपाय
प्रत्येक वर्ष फाल्गुन मास मध्ये शुक्ल पक्ष पूर्णिमा तिथिच्या दिवशी होळी हा सण साजरा करतात. धार्मिक मान्यता अनुसार होळी हा सण भगवान श्री कृष्ण हयाना सर्वात जास्त प्रिय होता. म्हणून संपूर्ण देशात हा सण जोरात साजरा करतात.
The text Holi 2023: Grah Dosh Mukti w Arthik Unnati karita He Upaay in Marathi be seen on our You tube Chanel Holi 2023 Astro Upay
धार्मिक मान्यता अनुसार देवी देवताची पूजा अर्चा व मंत्र जाप केल्याने विशेष लाभ होतात. त्यामुळे बऱ्याच समस्या दूर होतात. ज्योतिष शास्त्रामध्ये होळीच्या दिवशी काही करावयाचे उपाय आहेत. हे केलेतर बरेच लाभ होऊ शकतात. त्याच बरोबर कुंडली मधील ग्रह दोष सुद्धा दूर होऊ शकतात.
होळीच्या दिवशी करावयाचे उपाय : Holi 2023 Astro Upay
1. ज्योतिष शास्त्रा नुसार मानसिक रोगा पासून मुक्ती मिळण्यासाठी व्यक्तिने होळी पेटल्यावर त्यामध्ये एक सुकलेला नारळ, काळे तीळ, लवंग, व पिवळी मोहरी घेऊन आपल्या डोक्यावरून फिरवून अग्निमध्ये टाकावे. होळीच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन मास शुक्ल पक्ष ह्या दिवशी राहू हा ग्रह उग्र असतो त्यामुळे कोणती सुद्धा चुकीची काम करू नका त्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील.
आपल्या परिवारात जर कोणी बरेच दिवसा पासून आजारी असेलतर त्याला होळीची राख घेऊन त्याचा तिलक लावावा. त्यामुळे त्याला लाभ होऊ शकतो.
2. होळीच्या दिवशी सर्वात पहिल्यांदा श्री गणेश ह्यांची पूजा अर्चा करून त्यानं दूर्वा व लाल फूल अर्पित करा. ग्रह दोष पासून मुक्ती मिळण्यासाठी शिवलिंगची पूजा करताना तुपाचा दिवा लाऊन होळीची राख अर्पित करा. त्याच बरोबर अंघोळीच्या पाण्यात ही राख थोडीशी घालून त्याने आंघोळ करा. असे केल्याने लाभ मिळतात व कुंडली मधील उग्रग्रह शांत होतो. त्याच बरोबर महा मृत्युनजय मंत्र 108 वेळा म्हणा.
3. ज्योतिष शास्त्र नुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजा समोर थोडा गुलाल टाकून दोन मुखी दिवा लावावा असे केल्याने आर्थिक तंगीच्या समस्या दूर होऊन आर्थिक वृद्धी होण्याचे सर्व मार्ग खुले होतात. असे केल्याने व्यापारात सुद्धा वृद्धी होते.
4. होळीच्या दिवशी माता लक्ष्मीला गुलाल लावावा व फूल, फळ, अर्पित करावी त्यामुळे विशेष लाभ होतो. ह्या दिवशी माता लक्ष्मीची विधी पूर्वक पूजा करावी व हा उपाय जरूर करावा.
5. ज्योतिष शास्त्र नुसार हिरवा रंग हा सुख समृद्धी असणारा बुध ग्रह ह्याच्याशी जोडलेला आहे. म्हणून ह्या दिवशी हिरव्या रंगाचा वापर जरूर करावा. त्याच बरोबर घरात लावलेल्या झाडावर थोडासा हिरवा रंग टाकावा. असे केल्याने लाभ होतात.