स्वादिष्ट करंजी बिना मैदा, मावा, खवा व बिना तळता
आता होळी हा सण आला आहे. तेव्हा होळी स्पेशल करंजी म्हणजेच गुजिया अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला मैदा, खवा, मावा किंवा तेल किंवा तूप तळण्यासाठी वापरणार नाही. अगदी झटपट करंजी किंवा गुजिया आपण बनवणार आहोत.
The text Holi Special Delecious Karanji Without Maida, Mava And Without Frying in Marathi be seen on our You tube Chanel Holi Special Delecious Karanji Without Maida, Mava And Without Frying
आपण ह्या साइटवर करंजीचे बरेच पदार्थ कसे बनवायचे ते पाहिले आहे. त्याची लिंक मी येथे देत आहे. (विविध प्रकारच्या करंज्या)
झटपट स्वादिष्ट करंजी बनवण्यासाठी आपण बारीक रवा, दूध, साखर, ड्रायफ्रूट, डेसिकेटेड कोकनट वापरले आहे. हे सर्व साहित्य हेल्दी आहे.
आपण महाराष्ट्रात होळीला पुरणाची पोळी बनवतो व करंजी गुजिया हे नॉर्थ इंडिया ह्या भागात बनवले जाते पण आता पूर्ण भारतभर करंजी म्हणजेच गुजिया सुद्धा बनवल्या जातात.
साहित्य:
2 कप फूल क्रीम दूध
6-7 काड्या केशरच्या
1 कप बारीक रवा
1 टे स्पून तूप (रवा भाजण्यासाठी)
1/2 कप साखर
2 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
1/4 कप ड्रायफ्रूट (कुटुन)
2 टे स्पून तूप (मिश्रणात घालण्यासाठी)
2 टे स्पून दूध (मिश्रणात घालण्यासाठी)
कृती: प्रथम दूध गरम करून 10 मिनीत मंद विस्तवावर आटवून घ्या. दूध आटवतान त्यामध्ये केशर घाला म्हणजे छान रंग व सुगंध येईल. दुसऱ्या एका पॅन मध्ये 1 टे स्पून तूप व रवा गुलाबी रंगावर भाजून घ्या. ड्रायफ्रूट थोडे कुटून घ्या. साखर ग्राइंड करून घ्या.
रवा भाजून झाल्यावर त्यामध्ये हळू हळू दूध घालून मिक्स करत जा म्हणजे रवा छान फुलेल. आता रवा एका प्लेट मध्ये काढून घ्या, व त्याच पॅनमध्ये डेसिकेटेड कोकनट थोडेसे भाजून घ्या.
आता रवा, डेसिकेटेड कोकनट, ड्रायफ्रूट, वेलची पावडर, पिठीसाखर, तूप व 2 टे स्पून दूध घालून मिश्रण चांगले मळून घ्या.
मग मिश्रणाचे एक सारखे लिंबा एव्ह्डे गोळे करून घ्या. व त्याला छान करंजी चा आकार द्या. मग सर्व्ह करा.