घरगुती टिप्स-ट्रिक्स: घरातून मुंग्या, माश्या, उंदीर, पाली, मच्छर व झुरळ पळवून लावायचे उपाय
प्रतेक घरात मुंग्या, माश्या, उंदीर, व झुरळ ह्या पैकी कोणते ना कोणते छोटे छोटे जीवजंतु असतातच त्यामुळे आपण परेशान होतो. हे छोटे जीवजंतु दियासायला अगदी छोटे दिसतात पण त्यांचे कारनामे खतरनाक असतात. त्यामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे उंदीर, मच्छर, कॉकरोच व माश्या ह्यांची समस्या जास्त असते. त्यावर दुर्लक्ष करता कामा नये. कारणकी हे छोटे जीवजंतु आपल्याला आरोग्यासाठी घातक आहेत.
The text Home Remedies: Gharatun Mungya, Mashya, Undir, Pali, Machar w Zural Palun Lavaychi in Marathi be seen on our You tube Chanel Home Remedies
उंदीर, मच्छर, कॉकरोच व माश्या ह्यांना पळवून लावणे व मारण्याचे आपण बरेच प्रयत्न करतो पण ते जायचे नाव घेत नाहीत.
आज आपण उंदीर, मच्छर, कॉकरोच, मुंग्या व माश्या ह्यांना पळवून लावायचे घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. हे उपाय वापरुन आपण त्याना पळवून लावू शकतो.
उंदीर, मच्छर, कॉकरोच, मुंग्या व माश्या पळवून लावायचे घरगुती उपाय:
1. कॉकरोच म्हणजेच झुरळ पासून छुटकारा:
साधारण पणे प्रतेक घरात कॉकरोचा सुळसुळाट असतो व महिला तर झुरळांना घाबरतात. त्यासाठी कांदा,लसूण व काळेमिरे सम प्रमाणात घेऊन वाटून त्याची पेस्ट बनवून स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याने जेथे झुरळ आहेत तेथे स्प्रे करा असे रोज करा त्यामुळे घरातील झुरळ नाहीशी होतील.
2. उंदीर पळवून लावण्यासाठी उपाय:
जर आपल्या घरात उंदरांनी धुमाकूळ घतला आहेतर पेपरमिंटच्या गोळ्यांचे तुकडे घरात सर्व कोन्यामध्ये ठेवा. किचनमध्ये सुद्धा पेपरमिंटच्या गोळ्याचे तुकडे ठेवा. पेपरमिंटच्या वासानी उंदीर पळून जातात किंवा मरतात.
उंदरांना पळवण्याचा अजून एक उपाय आहे की थोडे काळे मिरे घेऊन जेथे उंदीर लपतात तेथे ठेवावे. 24 तासात उंदीर घरा बाहेर पळून जातील.
उंदीरला घरातून पळवण्याच्या अजून एक उपाय म्हणजे घरात मांजर पाळा, मांजराला पाहून उंदीर पळून जातात कारणकी ते उंदीर खातात.
3. माश्या पासून मुक्ती मिळण्यासाठी:
घरात माश्या झाल्यातर त्यासाठी लिंबूचा वापर फायदेमंद माहे. घरात पोछा मारताना 3-4 लिंबाचा रस पाण्यात टाकून पोछा मारा. काही तासांतच माश्या पळून जातील.
4. पालींना घरातून बाहेर पळवून लावण्यासाठी:
पालींना घरातून बाहेर पळवून लावण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे मोरपिस. घरात भिंतीवर 3-4 मोरपिस सेलो टेपने चिटकवा. मोर पालींना खातात म्हणून पाली मोरपंखला घाबरतात.
5. मुंग्याच्या त्रासापासून मुक्ती:
मुंग्याच्या बिळा जवळ कडू काकडीचे बारीक तुकडे करून टाका काही तासांतच मुंग्या निघून जातील.
6. मच्छर पासून छुटकारा मिळण्यासाठी:
मच्छर ना घरातून पळवून लावण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे कडीलिंबाचे तेल. घरात कडीलिंब तेलाचा दिवा लावावा किंवा गुडनाइट च्या रीफील मध्ये जे लिक्विड असते त्याला काढून त्यामध्ये कडीलिंबाचे तेल भरून त्याचा वापर करा घरात एक सुद्धा मच्छर राहणार नाही.
ह्या घरगुती वस्तूंचा वापर करून घरातून मुंग्या, माश्या, उंदीर, पाली, मच्छर व झुरळ पळवून लावा. जर आपल्याला हे उपाय योग्य वाटलेतर जरूर शेयर करा, लाइक करा.