महत्वाच्या टिप्स: सकाळी उठल्या उठल्या ही 5 कामे केल्यास पूर्ण दिवस जाईल खराब
आपण सकाळी उठल्या उठल्या ही 5 कामे केली नाही पाहिजे नहितर आपला पूर्ण दिवस जाईल खराब, चला तर म पाहूया आपण कोणती कामे केली तर दिवस खराब जाऊ शकतो.
सकाळी पुढील 5 कामे करण्याची चूक करू नका:
आपण सकाळी उठलो की कोणत्या कामाची सुरवात करतो त्यावर पूर्ण दिवस चांगला जाणे हे अवलंबून असते. अगदी अनाहूत पणे आपण अश्या काही चुका करतो त्यामुळे दिवस मग खराब जातो. जर आपण सुद्धा सकाळी उठल्यावर पुढील चुका करीत असाल तर लगेच थांबवा.
1. सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल पाहणे:
ज्या लोकांकडे स्मार्टफोन आहे त्यामधील 90% लोक सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल चेक करतात. जर आपण असे करीत असालतर त्यामुळे आपण लगेच तनाव मध्ये येत असाल. कारण आपण सर्वात पहिले मेल पहातो. त्यामुळे लगेच आपल्याला कामाचे प्रेशर वाढते. सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडिया पासून थोडा वेळ बाजूला रहा. कारण सकाळी उठल्यावर लगेच हातात मोबाइल घेऊन पहाण्याची मग सवय लागते. त्यापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जे आपण सकाळी मोबाइल पासून दूर राहिलो तर आपल्याला पूर्ण दिवस हलके व आनंदी राहता येते. त्यामुळे आपले संपूर्ण दिवस काम पण चांगली होतात.
2. सकाळचा नाश्ता कधी सुद्धा स्कीप करू नका:
आपण सकाळी घाई गडबडीत सकाळचा नाश्ता नाही केलातर पूर्ण दिवस बेकार जाईल. वैद्यकीय शास्त्रानुसार रोज सकाळी जे लोक नाश्ता करून कामाला जातात ते शारीरिक दृष्टीने फिट राहतात व मानसिक दृष्टीने शार्प होतात. त्याना शरीराचे वजन वाढण्याची भीती नसते. तसेच टाइप 2 डायबीटीस व हृदय रोगच्या समस्या होत नाहीत. म्हणूनच सकाळचा नाश्ता स्कीप करू नका. दिवसाची सुरवात चांगली करा.
3. सकाळी अंथरुणातून उठताना लगेच उभे राहू नका:
आपण उठल्या उठल्या उभे राहिलो तर गुरुत्वाकर्षण प्रक्रियानी शरीरातील रक्त जोरात पायापर्यंत जाते ते आपल्या शरीराचे ब्लड प्रेशर एकदम कमी करते त्यामुळे आपल्याला अस्वथ वाटते. ज्याना ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यानी ही चूक कधी सुद्धा करू नये. उठल्यावर काही मिनिट आंथरूणांतच बसून मग उठावे.
4. सकाळी उठल्यावर लगेच व्यायाम करू नये:
सकाळी उठल्यावर आपली लगेच धावपळ सुरू होते. मग आपण बरेच वेळा व्यायाम करणे सोडतो. पण त्यामुळे आपल्याला पूर्णदिवस सुस्ती आल्या सारखे वाटते. व्यायाम केल्याने आपले शरीर व मन आनंदी राहते व प्रसन्न वाटते म्हणून रोज सकाळी व्यायाम जरूर करा.
5. आपल्या संपूर्ण दिवसाचे प्लॅनिंग न करता बाहेर पडू नका:
आपण रोज सकाळी संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक आखून काम केलेतर सर्व कामे वेळेत होऊन आपल्याला आपल्या कामाचे समाधान मिळू शकते. त्याच बरोबर आपण आपले ऑफिस व घर छान सांभाळू शकता. आपले प्रतेक काम वेळेत होऊ शकते. त्यासाठी सकाळीच एक वेळापत्रक मनातल्या मनात आखा व त्यानुसार कामाचे नियोजन करून काम करा.