5 मिनिटमध्ये बिना गॅस, घी व मावा फुटाणा डाळ बर्फी
आपण कोणती सुद्धा मिठाई बनवायचे म्हंटले की बराच वेळ लागतो. आपण बराच वेळ गॅस वापरुन भाजत बसतो तसेच तूप पण बरेच लागते. कधी कधी आपल्याला मिठाई बनवायला वेळ पण नसतो व आपल्याला काही गोड खावेसे वाटले तर झटपट अश्या प्रकारची मिठाई आपण बनवू शकतो.
The text Bina Gas Bina Ghee Bina Mawa 5 Minit madhe Mithai in Marathi be seen on our You tube Chanel Bina Gas Bina Ghee Bina Mawa 5 Minit madhe Mithai
आपण बेसन किंवा गव्हाचे पीठ वापरुन बर्फी बनवतो त्यामुळे टे खूप भाजावे लागते व त्याला तूप सुद्धा जास्त प्रमाणात लागते. आजकाल सगळे आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात. त्यामुळे अश्या प्रकारची मिठाई बनवा मस्त लागते. आपण अशी मिठाई आरती नंतर प्रसाद म्हणून सुद्धा देवू शकतो.
आपण आज जी मिठाई बनवणार आहोत ती पौस्टिक सुद्धा आहे.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
सेट करण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 12 पिसेस
साहित्य:
1 कप फुटाण्याची डाळ (भाजकी डाळ)
3/4 कप साखर
1 कप डेसिकेटेड कोकनट
8-10 काजू
2 टे स्पून दूध
1 टी स्पून वेलची पावडर
1 टी स्पून तूप ट्रे ला लावायला
पिस्ता तुकडे सजावटसाठी
कृती: प्रथम फुटाणा डाळ मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. पाहिजेतर मग चाळून घ्या. मग एका बाउलमध्ये काढून ठेवा.
मग साखर, डेसिकेटेड कोकनट, काजू वेलची पावडर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या. मग फुटण्याच्या डाळीच्या मिश्रणात मिक्स करून 2 टे स्पून दूध घालून चांगले मळून घ्या.
एक ट्रे ला तूप लावून त्यावर पिस्ताचे तुकडे पसरवून त्यावर मिश्रण एक सारखे थापुन घ्या. मग फ्रीजमध्ये 15 मिनिट सेट करायला ठेवा.
मग फ्रीज मधून बाहेर काढून त्याच्या एक सारख्या वड्या कापून सर्व्ह करा.