परफेक्ट टेस्टी मजेदार मैक्रोनी पास्ता मुलांच्या डब्यासाठी नाश्तासाठी
मैक्रोनी पास्ता ही डिश मुलांची अगदी प्रिय आहे. मैक्रोनी आपण अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आज आपण अगदी परफेक्ट मैक्रोनी पास्ता कसा बनवायचा ते पाहू या. मैक्रोनी पास्ता बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. तसेच आपण त्यामध्ये भाज्या घालणार म्हणजे तो पौष्टिक सुद्धा बनतो. मुले भाज्या खायला कुरकुर करतात. मग अश्या प्रकारे भाज्या खातील.
परफेक्ट टेस्टी मजेदार मैक्रोनी पास्ता मुलांच्या डब्यासाठी नाश्तासाठी ह्या आर्टिकलचा शॉर्ट विडियो पुढे दिलेल्या क्लिकवर पाहू शकता: मैक्रोनी पास्ता
मैक्रोनी पास्ता आपण नाश्तासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या छोट्या पार्टीसाठी सुद्धा आपण बनवू शकतो. आता परीक्षा संपलीकी शाळेला सुट्टी लागेल. मग रोज काही तरी आवडतीची डिश खायला पाहिजे तर मग अश्या प्रकारचा मैक्रोनी पास्ता बनवा मुले खुश होतील.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
250 ग्राम मैक्रोनी
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
1 मध्यम आकाराचा टोमॅटो (चिरून)
1 मध्यम आकाराची शिमला मिरची (चिरून)
5-6 फ्रेंच बिन्स (चिरून)
1 छोटे गाजर (चिरून)
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
2 टे स्पून टोमॅटो केचप
2 टी स्पून मॅगी मसाला
1 टी स्पून ऑरेगनो
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून मिरे पाऊडर
2 टे स्पून तेल
मीठ चवीने
कोथिंबीर सजावटीसाठी
कृती: कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, फ्रेंच बिन्स, गाजर धुवून चिरून घ्या. कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या. एक मोठ्या आकाराच्या भांड्यात 4 मोठे ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये एक टी स्पून मीठ व तेल घालून मैक्रोनी घाला मग 5 मिनिट शिजवून घ्या. मग पाच मिनिट झाल्यावर मैक्रोनी चाळणीवर काढून घ्या. पाणी पूर्ण निथळू द्या.
एका मोठ्या आकाराच्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आल-लसूण-हिरवी मिरची थोडी परतून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, फ्रेंच बिन्स 2-3 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, मिरे पावडर, ऑरेगनो, टोमॅटो केचप घालून मीठ घालून मिक्स करा. मग त्यामध्ये मैक्रोनी घालून मिक्स करून 2 वाफ येऊ द्या.
मग गरम गरम मैक्रोनी पास्ता सर्व्ह करा.